शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उदयनराजेंच्या भेटीगाठी, लष्करप्रमुखांनाही दिलंय निवेदन साताऱ्यासाठी

By महेश गलांडे | Published: February 17, 2021 5:01 PM

1 / 10
राज्यसभा खासदार आणि साताऱ्यातील भाजपा नेते उदयनराजे भोसलेंनी सध्या भेटीगाठींचे दौरे आयोजित केल्याचं दिसून येत आहे. दिल्ली दरबारी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट उदयनराजेंनी घेतली.
2 / 10
उदयनराजेंनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचीही दिल्लीत भेट घेतली होती, त्यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
3 / 10
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीबाबतचा अधिकृत तपशील समोर आलेला नाही.
4 / 10
गेल्या काही दिवसांमध्ये उदयनराजेंनी शरद पवार तसेच काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार श्रीनिवास पाटील, केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उदयनराजे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने त्यांची ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
5 / 10
उदयनराजे भोसले आपल्या दिलदार स्वभावामुळे सर्वपरिचीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेल्यापासून काँग्रेस आघाडीच्या नेत्यांसोबतच त्यांचा वावर कमी झालाय. पण, मित्र बनून ते अनेकांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत.
6 / 10
दिल्ली दौऱ्यावर असताना उदयनराजेंनी साताऱ्यातील प्रश्न घेऊन केंद्रीय मंत्र्यांच्याही भेटी घेतल्या होत्या, त्यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांही भेट घेतली होती
7 / 10
मराठा आरक्षणासाठी आज पुन्हा एकदा उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतही मराठा आरक्षणासंदर्भातील मागणीचे निवेदन त्यांनी या नेत्यांना दिले आहे.
8 / 10
साताऱ्यात आधुनिक लष्करी प्रशिक्षण केंद्र आणण्याचा संकल्प बाळगून उदयनराजेंनी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचीही भेट घेतली. सैनिकांचा जिल्हा असेल्या या सातारा जिल्ह्यात छावणी उभारली गेली तर ती नव्या पिढीला प्रेरणादायी असेल. तसेच ती अभिमानाची गोष्ट असेल.
9 / 10
या छावणीच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जतन करता येईल. जिल्ह्यातील तरुणांना व शेतकऱ्यांना या लष्करी छावणीमुळे व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे उदयनराजेंनी म्हटलंय.
10 / 10
लष्काराची ही छावणी सातारच्या वैभवात मोठी भर घालेल. तसेच लष्करी छावणीला आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही, असंही उदयनराजेंनी म्हटलंय. उदयनराजेंनी आपल्या ट्विटरवरुन या भेटीचे फोटो शेअर केल आहेत.
टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेIndian Armyभारतीय जवानChief Ministerमुख्यमंत्रीmanoj naravaneमनोज नरवणे