शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

LIC Policy For Women: महिलांसाठी खास! एलआयसी पॉलिसीत 29 रुपयांत चार लाख बचत, ३० लाखांचा विमा मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 10:23 IST

1 / 9
देशाची सर्वात मोठी विमा कंपनी LIC ची विमा योजना आली आहे. महिलांसाठी खास विमा योजना काढण्यात आली आहे. ही योजनी लोकप्रियदेखील होत आहे. या योजनेचे नाव ‘आधार शिला’ आहे. या योजनेमध्ये आधार हे नाव जोडण्याचा खास उद्देश आहे. ही पॉलिसी केवळ महिलाच खरेदी करू शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे.
2 / 9
ही योजना 1 फेब्रुवारी 2020 रोजी लाँच करण्यात आली. लाइफ कव्हरसोबत, ही पॉलिसी बचतीच देखील सुविधा देते. जर एखाद्या महिलेने या पॉलिसीमध्ये दररोज 29 रुपये गुंतवले तर तिला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळतील. या काळात या योजनेत कर्जही घेता येते.
3 / 9
8 ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही महिला ही पॉलिसी घेऊ शकते. ही पॉलिसी 10 वर्षांसाठी खरेदी केली जाऊ शकते. कमाल मुदत 20 वर्षे आहे. मॅच्युरिटीवेळी महिलेचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
4 / 9
या योजनेअंतर्गत, किमान 75 हजार रुपयांचा विमा मिळू शकतो तर कमाल रक्कम 30 लाख रुपये आहे. यामध्ये पॉलिसीधारक अपघाताचा लाभ घेऊ शकतो.
5 / 9
जर एखादी महिला 20 वर्षांची असेल आणि पॉलिसीची मुदत देखील 20 वर्षांची असेल आणि तिने 3 लाख रुपयांचा विमा उतरवला असेल, तर तिला वार्षिक सुमारे 10,649 रुपये प्रीमियम भरावा लागेल. मात्र, पुढील वर्षी हा प्रीमियम 10,868 रुपयांपर्यंत वाढेल.
6 / 9
मॅच्युरिटी झाल्यावर तिला ४ लाख रुपये मिळतील. 2 लाख विमा रक्कम आणि शिल्लक रक्कम ही लॉयल्टी बोनस असेल. या प्लॅनमध्ये मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम जमा केले जाऊ शकतात. तुम्ही वेळेवर प्रीमियम भरण्यास विसरल्यास, तुम्हाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. परंतु, तुम्ही मासिक आधारावर प्रीमियम भरण्याचे निवडल्यास, तुम्हाला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल.
7 / 9
पॉलिसी सुरू झाल्यापासून 5 वर्षांच्या आत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, विम्याच्या रकमेइतकी रक्कम दिली जाईल. परंतु, यानंतर मृत्यू झाल्यास, वारसाला विमा रक्कम आणि लॉयल्टी बोनस देखील मिळेल.
8 / 9
मॅच्युरिटी झाल्यावर, तुम्ही पूर्ण पेमेंट एकाच वेळी किंवा हप्त्यांमध्ये मिळवू शकता.
9 / 9
सलग दोन वर्षे प्रीमियम भरल्यानंतर ही पॉलिसी कधीही सरेंडर केली जाऊ शकते.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीWomenमहिला