शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:02 IST

1 / 8
लोकप्रिय बॉलिवूड गायक जुबिन गर्ग यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर 'स्कूबा डायव्हिंग' हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करतानाच त्यांचा मृत्यू झाला. समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन रंगीबेरंगी मासे आणि समुद्राखालचे जग पाहण्याचा अनुभव जितका रोमांचक असतो, तितकाच तो धोकादायकही असू शकतो.
2 / 8
जुबिन गर्ग यांच्या निधनामुळे या खेळातील धोक्यांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. स्कूबा डायव्हिंगची खोली डायव्हरच्या प्रशिक्षणावर आणि सर्टिफिकेशनवर अवलंबून असते.
3 / 8
PADI अर्थात प्रोफेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इनस्ट्रक्टरनुसार, नवीन डायव्हर्स फक्त १२ मीटर (४० फूट) खोलपर्यंत जाऊ शकतात. तर, ओपन वॉटर डायव्हर्स हे १८ मीटर (६० फूट) पर्यंत सुरक्षितपणे खोलात जाऊ शकतात.
4 / 8
अ‍ॅडव्हान्स डायव्हर्सना ३० मीटरपर्यंत (१०० फूट) जाण्याची परवानगी असते आणि ही सामान्य मनोरंजक डायव्हिंगची कमाल मर्यादा मानली जाते. विशेष प्रशिक्षण आणि उपकरणांसह टेक्निकल डायव्हर्स हे ४० मीटरपेक्षा जास्त खोलपर्यंत जाऊ शकतात.
5 / 8
स्कूबा डायव्हिंगमधील सर्वात मोठा धोका शरीरावर अचानक दाब बदलल्यामुळे निर्माण होतो. जसे-जसे डायव्हर खोल जातो, तसे-तसे पाण्याचा दाब वाढतो. जर तो खूप वेगाने वर आला, तर त्याला डीकंप्रेशन सिकनेस होऊ शकतो.
6 / 8
या स्थितीत रक्ताभिसरण संस्थेमध्ये हवेचे बुडबुडे तयार होतात, ज्यामुळे पक्षाघात, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. याशिवाय, जास्त खोलवर गेल्यावर ऑक्सिजन टॉक्सिसिटी आणि नायट्रोजन नारकोसिस यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागतो.
7 / 8
स्कूबा डायव्हिंग करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. नेहमी प्रमाणित प्रशिक्षक किंवा संस्थेच्या देखरेखीखाली डायव्हिंग करा. डायव्हिंग करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घ्या. अस्थमा, हृदयविकार किंवा कानाचे आजार असलेल्या व्यक्तींसाठी हे धोकादायक असू शकते.
8 / 8
डायव्हिंगनंतर पाण्याच्या पृष्ठभागावर वेगाने येऊ नका, हळू हळू वर या. सेफ्टी स्टॉप घेणे आवश्यक आहे, जेणेकरून शरीर वातावरणाशी जुळवून घेईल. या सोबत योग्य ब्रीदिंग पॅटर्न फॉलो करणे खूप महत्त्वाचे आहे.
टॅग्स :Swimmingपोहणे