शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Sania Mirza : देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट होणार सानिया; टीव्ही मॅकेनिकच्या लेकीने रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 12:35 IST

1 / 10
एका टीव्ही मॅकेनिकच्या मुलीने इतिहास रचला आहे. नेत्रदिपक भरारी घेतली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूरची मुलगी सानिया मिर्झा हवाई दलात भारताची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनणार आहे. सानियाने एनडीए परीक्षेत 148 वा रँक मिळवली आहे. मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे.
2 / 10
सानिया मिर्झा ही देहत कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जसोवर या एका छोट्याशा गावात राहते. सानियाने गुरू नानक गर्ल्स इंटर कॉलेज, मिर्झापूरमधून बाराची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ती यूपी 12वी बोर्डात जिल्ह्यात टॉपर आहे. 10 एप्रिल रोजी तिने एनडीए 2022 ची परीक्षा दिली.
3 / 10
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सानियाने मुलाखतीची तयारी करण्यासाठी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. रिपोर्टनुसार, सानिया 27 डिसेंबर 2022 रोजी पुण्यातील खडकवासला एनडीएमध्ये सामील होणार आहे. सानियाचे वडील हे व्यवसायाने टीव्ही मेकॅनिक आहेत.
4 / 10
सानियाचे वडील शाहिद अली म्हणाले की, 'सानिया मिर्झा ही देशाची पहिली फायटर पायलट अवनी चतुर्वेदीला आपला आदर्श मानते. पहिल्यापासूनच सानियाला अनवीसारखं व्हायचं होतं. सानिया ही देशातील दुसरी अशी मुलगी आहे, जिची फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे.'
5 / 10
सानियाची आई तबस्सुम मिर्झा म्हणाली, 'आमच्या मुलीमुळे आम्हाला आणि संपूर्ण गावाला अभिमान वाटते आहे. फायटर पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करून तिने आपल्या गावातील प्रत्येक मुलीला प्रेरित केले आहे.'
6 / 10
सानिया मिर्झा ही देशातील दुसरी अशी मुलगी आहे, जिची फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे. सानिया पहिल्यांदा ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे तिने पुन्हा परीक्षा दिली. सानिया म्हणाली की, 'फायटर पायलट बनणे हे माझे ध्येय होते.'
7 / 10
सानियाचा प्रेरणास्रोत अवनी चतुर्वेदी ही देशातील पहिली महिला पायलट आहे. पहिल्यापासूनच तिला अवनीसारखं व्हायचं होतं. विशेष म्हणजे, नॅशनल डिफेन्स अकादमी 2022 च्या परीक्षेत पुरुष आणि महिलांसाठी एकूण 400 जागा होत्या.
8 / 10
ज्यामध्ये 19 जागा महिलांसाठी होत्या. त्याच वेळी, यापैकी दोन जागा लढाऊ वैमानिकांसाठी राखीव होत्या. या दोनपैकी एक जागा सानिया मिर्झाने मिळवली आहे. एका टीव्ही मेकॅनिकच्या मुलीने घवघवीत यश मिळवल्याने सर्वत्र तिचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 10
(सर्व फोटो - अमर उजाला आणि सोशल मीडिया)
10 / 10
(सर्व फोटो - अमर उजाला आणि सोशल मीडिया)
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी