रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:05 IST
1 / 9भारतीय रेल्वेने सणांच्या दिवसात एक जबरदस्त अटींनी युक्त अशी योजना आणली आहे. जर एखाद्या प्रवाशाने येता-जाता अशी दोन्ही तिकिटे बुक केली तर त्याला तिकिटाच्या रकमेवर २० टक्के सूट देण्यात येणार आहे. परंतू, त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. 2 / 9होळी, गणेशोत्सव, दिवाळी, छट सारख्या सणांसाठी राऊंड ट्रिप पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. ही योजना केवळ सणांवेळीच लागू होणार आहे. येण्या-जाण्याचे तिकीट एकावेळीच बुक करणाऱ्यांना या स्कीमचा लाभ मिळणार आहे. 3 / 9म्हणजे जर एखाद्याचे तिकीटाची किंमत १००० रुपये असेल तर त्याला ८०० रुपयेच द्यावे लागणार आहेत. परंतू, हा डिस्काऊंट मिळविण्यासाठी काही अटींमध्ये हे तिकीट बसले तरच त्यात सूट मिळणार आहे. 4 / 9यासाठी पहिली अट म्हणजे प्रवाशांची नावे सारखीच असावीत. तसेच चढण्याचे आणि परत येण्याचे ठिकाण एकच असायला हवे. अनेकांना चढण्या-उतरण्यासाठी वेगळ्या ट्रेन पकडाव्या लागतात ज्या दुसऱ्या स्टेशनवर थांबतात. म्हणजे त्यांना ही सूट मिळणार नाही. 5 / 9प्रथम तुम्हाला जायचे तिकीट बुक करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला परतीचे तिकीट कनेक्टिंग प्रवासमधून काढावे लागणार आहे. परतीच्या तिकीटाला आगाऊ आरक्षण कालावधी (ARP) लागू होणार नाही. म्हणजेच प्रवासापूर्वी खूप आधी हे परतीचे तिकीट बुक करता येणार नाही. म्हणजे डिस्काऊंटमधील परतीचे तिकीट मिळणारच नाही, कारण सणाच्या काळासाठी ट्रेन आधीच फुल झालेली असेल. 6 / 9त्यातही आणखी एक अट म्हणजे येण्या-जाण्याची दोन्ही तिकीटे कन्फर्म तिकीटे असावीत. वेटिंग किंवा आरएसी तिकिटांना सूट मिळणार नाही. अनेकदा एकावेळचे किंवा दोन्ही वेळचे तिकीट हे वेटिंग किंवा आरएसी मिळते. या अटी एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत. 7 / 9दोन्ही तिकीटे एकाच माध्यमातून बुक करावी लागणार आहेत. म्हणजेच जायचे ऑनलाईन केले तर यायचे पण ऑनलाईनच करावे लागणार आहे. 8 / 9एवढे करूनही जर तुम्हाला डिस्काऊंटमध्ये तिकीट मिळाले तर तुम्हाला प्रवाशाचे नाव, तारीख किंवा डबा क्लास बदलता येणार नाही. तसेच या डिस्काऊंटच्या तिकीटावर रिफंडही मिळणार नाही. 9 / 9हे राऊंट ट्रिप पॅकेज फॉर फेस्टीव्हल स्कीमचा फायदा सर्वच ट्रेनना मिळणार नाहीय. फ्लेक्सी फेयर असलेल्या राजधानी, शताब्दी एक्स्प्रेसवर ही सूट लागू होणार नाही. उर्वरित ट्रेनमधील एसी, स्लीपर आणि स्पेशल ट्रेनना ही योजना लागू होणार आहे.