1 / 6गावाहून किंवा अन्य ठिकाणी प्रवासाला जायचे असल्यास आपण सोबत एक ना अनेक बॅगा घेतो. अनेकदा तर गावावरून धान्याची पोती, फळांच्या पेट्या आदी देखील सोबत आणले जाते. परंतू, आता रेल्वेने अशा वस्तू नेण्यावर बंधने आली आहेत. विमानासारखेच या लगेजवर लिमिट आणण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. आणि हा नियम सक्तीने लागू देखील केला जाणार आहे. 2 / 6रेल्वेने ट्विटर हँडलवर याची माहिती दिली आहे. प्रवाशांनी आपल्यासोबत जास्त सामान घेऊन जाऊ नये असे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वे प्रवासाला जाताना जास्त सामान घेऊन जाऊ नका, जर नेलेच तर लगेज व्हॅनसाठी बुकिंग करा. खूप सामान असेल तर प्रवासाची मजा अर्ध्यावर येईल, असा सल्लावजा इशारा रेल्वेने दिला आहे. 3 / 6रेल्वेच्या नियमानुसार वेगवेगळ्या श्रेणींच्या डब्यामधून प्रवासी आपल्यासोबत ४० ते ७० किलो एवढे सामान आपल्या डब्यातून घेऊन जाऊ शकतो. यापेक्षा जास्त वजनाचे सामान असले तर प्रवाशाला अधिकचे भाडे द्यावे लागणार आहे. 4 / 6रेल्वेने प्रत्येक डब्याच्या हिशेबाने वजन ठरविले आहे. स्लीपर क्लासमध्ये ४० किलो ग्रॅम वजन सोबत नेता येते. एसी टू टीयर डब्यातून 50 किलो वजन नेण्याची सूट आहे. फर्स्ट क्लास एसीमध्ये सर्वाधिक म्हणजे ७० किलो वजन नेते येते. 5 / 6जर एखादा प्रवासी अधिक सामान नेताना सापडला तर त्याला बॅगेज रेटच्या सहा पटीने अधिक दंड आकारला जाणार आहे. एखादा ४० किलोपेक्षा जास्तिचे सामान नेत असेल आणि ५०० किमीच्या अंतराच्या प्रवासाला निघाला असेलत तर त्याला १०९ रुपयांमध्ये लगेज व्हॅनमध्ये सामान ठेवता येणार आहे. मात्र, जर पकडला गेला तर त्याला साडे सहाशे रुपये द्यावे लागणार आहेत. 6 / 6रेल्वे प्रवासादरम्यान निर्बंध असलेल्या वस्तू नेणे गुन्हा आहे. म्हणजेच गॅस सिलिंडर, रॉकेल किंवा ज्वलनशील पदार्थ, फटाके, अॅसिड, दुर्गंधी येणाऱ्या वस्तू, ओले चामडे, तेल, तूप सारख्या वस्तू देखील नेता येत नाहीत. अशा वस्तू नेताना पकडले गेले तर प्रवाशावर रेल्वे कायद्याच्या कलम १६४ अन्वये प्रवाशांवर कारवाई होऊ शकते.