By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 13:25 IST
1 / 9नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबरला आपल्या वाढदिवसानिमित्त दिल्लीकरांना मोठी भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या दिल्लीतील द्वारका येथे यशोभूमी नावाचे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर राष्ट्राला समर्पित करतील. सध्या या सेंटरचा पहिला टप्पा तयार आहे. 2 / 9११ हजार लोकांची आसनक्षमता असलेले कन्व्हेन्शन सेंटर पूर्णपणे तयार होण्यासाठी मार्च २०२५ पर्यंत वेळ लागणार आहे. मात्र त्यापूर्वी टप्प्याटप्प्याने कार्यक्रमांसाठी ते खुले करण्यात येणार आहे.3 / 9अधिकार्यांनी सांगितले की, हा प्रोजेक्ट जगातील सर्वात मोठ्या सभा, परिषदा आणि प्रदर्शन सुविधांपैकी एक असणार आहे. यशोभूमीमध्ये एकूण ११ हजार प्रतिनिधींची क्षमता असलेली एकूण १५ कन्व्हेन्शन हॉल आणि १३ मिटिंग हॉल आहेत. 4 / 9७३ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर बांधलेल्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य हॉल आणि भव्य बॉलरूम देखील आहे. तसेच, देशातील सर्वात मोठा एलईडी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये बसवण्यात येणार आहे.5 / 9यशोभूमी पूर्णपणे तयार झाल्यावर ते आशियातील सर्वात मोठे कन्व्हेन्शन सेंटर असणार आहे. ज्याची क्षमता दिल्लीतील प्रगती मैदानावर असलेल्या भारत मंडपमपेक्षा दुप्पट असेल.6 / 9यशोभूमी तयार करण्यासाठी एकूण २५,७०३ कोटी रुपये खर्च आहे. पहिल्या टप्प्याचा खर्च ५४०० कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यात एक कन्व्हेन्शन सेंटर, दोन एक्झिबिशन हॉल आणि १३ कॉन्फरन्स रूम तयार करण्यात आल्या आहेत.7 / 9दुसऱ्या टप्प्यात तीन प्रदर्शन संकुले, हॉटेल, रिटेल आणि ऑफिस तयार होतील. सभागृहाची क्षमता सहा हजार लोकांची आहे. इनडोअर पार्किंग क्षमता २८६०८ आहे.8 / 9कन्व्हेन्शन सेंटरच्या प्लेनरी हॉलमध्ये सहा हजार लोक बसू शकतील. याच्या सभागृहात भारतातील सर्वात आधुनिक स्वयंचलित आसनव्यवस्था असेल. त्याचे लाकडी फ्लोअरिंग आणि भिंतीचे फलक अभ्यागतांना जागतिक दर्जाचा अनुभव देतील.9 / 9यशोभूमीमध्ये शाश्वततेवरही भरपूर भर देण्यात आला आहे. त्यात अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. त्यामुळे १०० टक्के वाया जाणारे पाणी पुन्हा वापरण्यात येणार आहे. येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणाही कार्यान्वित होणार आहे. त्याच्या छतावर सोलर पॅनल बसवले आहेत.