शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात एवढी वाढली पंतप्रधान मोदींची संपत्ती! जाणून घ्या, कशी करतात गुंतवणूक?

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 15, 2020 16:21 IST

1 / 15
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वार्षिक उत्पन्न किती आणि त्यांच्या बँक खात्यात किती रुपये जमा आहेत? हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असेल. दरवर्षी प्रमाणेच या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली संपत्ती आणि देणे यासंदर्भात माहिती दिली आहे.
2 / 15
अधिकांश भारतीयांप्रमाणे मोदीही आपले पैसे बँकेत बचत खात्यात अथवा मुदत ठेव खात्यात ठेवतात. त्यांनी आपली संपत्ती आणि देणी, यासंदर्भात केलेल्या घोषणेत ही माहिती दिली आहे. तर जाणून घेऊया, पंतप्रधान मोदींच्या उत्पन्नात किती झालीय वाढ?
3 / 15
गेल्या आर्थिक वर्षात पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत 26.26 टक्क्यांची वाढ झाली असून त्यांची सपत्ती 1,39,10,260 रुपयांहून 1,75,63,618 रुपये एढी झाली आहे.
4 / 15
पंतप्रधान मोदींच्या चल संपत्तीत गेल्या 15 महिन्यांत 36.53 लाख रुपयांची वाढ झाली. त्यांनी 12 ऑक्टोबरला जारी केलेल्या त्यांच्या संपत्तीच्या माहितीत 30 जूनपर्यंतच्या त्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळते.
5 / 15
पंतप्रधान मोदांच्या संपत्तीत ही वाढ त्यांना मिळणारा पगार आणि मुदत ठेव खात्यातील पैशांवर मिळणाऱ्या व्याजाच्या माध्यमाने झाली आहे. सरकारी कर्मचारी अथवा मंत्र्यांकडूनही साधारणपणे अशा प्रकारे पैशांची बचत केली जाते.
6 / 15
पंतप्रधान मोदींच्या अचल संपत्तीत साधारणपणे कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये 1.1 कोटी रुपयांचा प्लॉट आणि घर सूचीबद्ध केले आहे. ते त्यांच्या कुटुंबीयांसह याच्या एका भागाचे मालक आहेत.
7 / 15
पंतप्रधान मोदींचा पगार दोन लाख रुपये एवढा आहे. जागतिक पातळीचा विचार करता हा पगार अत्यंत कमी आहे.
8 / 15
कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेचा विचार करता पंतप्रधान मोदींनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, कॅबिनेटमधील सदस्य आणि खासदारांसोबतच आपला पगारातही 30 टक्क्यांनी कमी केला आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून याला सुरुवात झाली आहे.
9 / 15
गेल्या 31 मार्च, 2019 रोजी पंतप्रधानांच्या बचत खात्यातील शिल्लक 4,383 रुपये होती, ती 30 जूनला 3.38 लाख रुपये झाली. जून अखेरीस त्यांच्याकडे 31,450 रुपये रोख होते.
10 / 15
भारतीय स्टेट बँकेच्या गांधीनगर शाखेत त्यांच्या मुदत ठेव खात्यातील रक्कम 30 जून 2020पर्यंत वाढून 1,60,28,039 रुपये झाली. ही रक्कम गेल्या आर्थिक वर्षात 1,27,81,574 रुपये एवढी होती.
11 / 15
हा आकडा, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राशीही मेळ खाणारा आहे. यात जमा रक्कम 1.27 कोटी रुपयांसह 1.41 कोटी रुपयांची चल संपत्ती सूचीबद्ध करण्यात आली आहे.
12 / 15
पंतप्रधानांना कुणाचेही देणे नाही. तसेच त्यांच्याकडे कारही नाही. त्यांच्याजवळ सोन्याच्या चार अंगठ्या आहेत.
13 / 15
पंतप्रधान मोदी 8,43,124 रुपयांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राच्या माध्यमाने करांची बचत करतात आणि आपल्या जीवन विम्यासाठी 1,50,957 रुपयांचे प्रीमियम भरतात.
14 / 15
2019-20च्या आर्थिक वर्षात, पंतप्रधानांकडे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचे 7,61,646 रुपये होते. तसेच त्यांनी जीवन विम्याच्या प्रीमियमच्या स्वरुपात 1,90,347 रुपये भरले आहेत.
15 / 15
पंतप्रधान मोदींनी जानेवारी 2012 मध्ये 20,000 रुपयांचा इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर बॉन्‍ड खरेदी केला होता. तो अद्याप मॅच्‍योर झालेला नाही.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधानIndiaभारत