शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणाऱ्या भेटवस्तूंचे पुढे काय होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:21 IST

1 / 8
जगभरातील देशांच्या पंतप्रधानांना परदेश दौरे, राजनैतिक बैठका आणि विशेष कार्यक्रमांदरम्यान अनेक प्रकारच्या भेटवस्तू मिळतात. यापैकी बहुतेक भेटवस्तू सांस्कृतिक, ऐतिहासिक, कलात्मक किंवा प्रतीकात्मक स्वरूपाच्या असतात. यामध्ये मौल्यवान कपडे, हस्तकला, ​​कलात्मक वस्तू, पुस्तके किंवा पारंपारिक उत्पादने यांचा समावेश असतो.
2 / 8
या भेटवस्तूंमागील उद्देश बहुतेकदा मैत्री, आदर आणि राजनैतिक संबंध मजबूत करणे हा असतो. मात्र, अनेक देशांमध्ये या भेटवस्तू सरकारी मालमत्ता मानल्या जातात आणि त्या संग्रहालयात किंवा सरकारी निधीत जमा कराव्या लागतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आजवर अशाच काही सुंदर भेटवस्तू मिळाल्या आहेत. पण, नंतर या भेटवस्तू कुठे जातात? चला जाणून घेऊया...
3 / 8
रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६०० हून अधिक भेटवस्तू मिळाल्या आहेत. या भेटवस्तूंचा लिलाव सुरू झाला आहे. तुम्ही देखील या भेटवस्तू देखील खरेदी करू शकता. या लिलावात सहभागी होण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा तसेच त्यांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा लिलाव सुरू आहे.
4 / 8
यावेळी, पंतप्रधान मोदींना मिळालेल्या ६०० भेटवस्तूंच्या लिलावात टोप्या, बूट, बॅडमिंटन रॅकेट, राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती, राम मंदिराचे मॉडेल, कलश आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश आहे. पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेत्या नित्या श्री शिवन यांच्या बॅडमिंटन रॅकेटची किंमत लिलावात ५.५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
5 / 8
तर जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या शरद कुमारच्या कॅपची किंमत सर्वाधिक ९ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे या लिलावात तुम्ही लाखोंमध्येच नाही, तर ७०० रुपयांमध्येही काही वस्तू खरेदी करू शकता. या लिलावात सर्वात स्वस्त भेटवस्तूची किंमत फक्त ७०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
6 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'एक्स' सोशल मीडिया हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले होते की, 'दरवर्षी मी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या स्मृतिचिन्हांचा लिलाव करतो. लिलावातून मिळणारे उत्पन्न 'नमामि गंगे इनिशिएटिव्ह'ला जाते. मला तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की या वर्षीचा लिलाव सुरू झाला आहे. तुम्हाला आवडणाऱ्या स्मृतिचिन्हांसाठी बोली लावा. 'नमामि गंगे' हा गंगा नदीच्या संरक्षण आणि पुनरुज्जीवनासाठी सरकारचा एक उपक्रम आहे. या लिलावातून मिळालेला पैसा सरकार 'नमामि गंगे' या उपक्रमात खर्च करते.
7 / 8
पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू खरेदी करण्यासाठी आणि लिलावात सामील होण्यासाठी https://pmmementos.gov.in/#/ या अधिकृत वेबसाइटवर जा आणि स्वतःची नोंदणी करा. यानंतर तुम्ही या लिलावात बोली लावू शकता. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
8 / 8
२०२३ च्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींना मिळालेल्या ९१२ भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला होता. या भेटवस्तूंचा लिलाव २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त सुरू झाला. विशेष म्हणजे या लिलावात गुजरातमधील मोढेरा सूर्य मंदिर आणि चित्तोडगडमधील विजय स्तंभ यांच्या प्रतिकृती लिलावात आलेल्या भेटवस्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आल्या.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी