शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे ट्विटर फॉलोअर्स 5 कोटींच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 20:25 IST

1 / 7
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ट्विटरवरील नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 50 मिलियन इतकी झाली. म्हणजेच 5 कोटींचा आकडा पार झाला आहे. ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलोअर्स असलेल्या राजकीय नेत्यांच्या लिस्टमध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानकावर आहेत.
2 / 7
नरेंद्र मोदी बऱ्याच वर्षांपासून सोशल मीडियात अॅक्टिव्ह आहेत. ज्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हापासून ते ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला समर्थकांसोबत संवाद साधत होते. नरेंद्र मोदींना ट्विटरवर गेली दहा वर्षे अॅक्टिव्ह आहेत. ट्विटरवर सध्या त्यांचे फॉलोअर्सची 5 कोटींच्या घरात आहेत.
3 / 7
दरम्यान, जगभरातील नेत्यांच्या लोकप्रियतेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पहिल्या स्थानकावर आहेत. त्यांचे फॉलोअर्स जवळपास 10.08 कोटी आहेत.
4 / 7
तर दुसऱ्या स्थानकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे फॉलोअर्स 6.4 कोटी आहेत.
5 / 7
भारतीय नेत्यांमध्ये मोदीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या नंबरवर आहेत. त्यांचे फॉलोअर 1 कोटी 54 लाखांपेक्षा जास्त आहेत.
6 / 7
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह1 कोटी 52 लाख फॉलोअर्ससोबत तिसऱ्या स्थानी आहेत.
7 / 7
तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी 1 कोटी 6 लाख फॉलोअर्ससोबत पाचव्या स्थानावर आहेत.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटर