Tina Dabi: जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी शेअर केले असे फोटो, नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:14 IST
1 / 8आयएएस अधिकारी टीना डाबी यांनी विविध सरकारी पदांवर काम पाहिलं आहे. तसेच राजस्थानमधील गहलोत सरकारमध्ये विविध प्रमुख प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 2 / 8दरम्यान सोशल मीडियावर भरपूर सक्रीय राहणाऱ्या टीना डाबी यांनी हल्लीच जैसलमेरमधील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो लोकांना खूप आवडत आहेत.3 / 8टीना डाबी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर जैसलमेरचे सुंदर फोटो शेअर करत लिहिले की, हे वाळवंट आहे यावर कोण विश्वास ठेवणार? 4 / 8 टीना डाबी यांनी जे फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये स्वर्णनगरी असलेल्या जैसलमेरचं सौंदर्य उठून दिसत आहे. 5 / 8पावसाळ्यानंतर जैसलमेरमध्ये हिरवळ दाटली आहे ते पाहिल्यावर कुणीही या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडू शकतं. 6 / 8 जैसलमेरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानंतर इथे देशी विदेशी पक्ष्यांचं आगमन होऊ लागलं आहे. 7 / 8दमदार पावसानंतर जैसलमेरवर हिरवळीचा गालिचा अंथरला गेला आहे. 8 / 8आयएएस अधिकारी टीना डाबी यांनी २०१८ मध्ये अतहर आमिर यांच्याशी विवाह केला होता. मात्र त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर टीना डाबी यांनी आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याशी विवाह केला आहे.