सलाम! सैनिकांचे प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी 3 डिग्रीमध्ये रिहर्सल, फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:40 IST
1 / 8देशाचा प्रजासत्ताक दिन काहीच दिवसावर येऊन ठेपला आहे. कडाक्याच्या थंडीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तयारी सैनिकांनी सुरू केली आहे. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत आणि कडाक्याच्या थंडीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे. 2 / 8दिल्लीत प्रजासत्ताक दिनापूर्वी परेड रिहर्सल सुरू आहेत. दिल्लीत विक्रमी थंडी असतानाही गुरुवारी दिल्लीत परेडची तालीम जोरात सुरू असल्याचे पाहायला मिळाले. प्रजासत्ताक दिनाच्या परेड रिहर्सल दरम्यान राष्ट्रपतींचे अंगरक्षक सहभागी झाले आहेत.3 / 8या वर्षी दिल्लीत विक्रमी थंडी पडली आहे, तरीही या थंडीत भारतीय जवान मोठ्या उत्साहाने परेडची तयारी करत असल्याचे दिसत आहे. 4 / 8प्रत्येक वर्षी प्रजास्ताक दिनाच्या परेडची तयारी काही दिवस अगोदरच सुरू होत असते. तसेच या महिन्यात दिल्लीत मोठ्या प्रमाणात थंडी असते. 5 / 8या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला मिस्त्र'चे राष्ट्रपती अब्देल फतह अल सीसी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 6 / 8मागच्या दोन वर्षापासून जगभरात कोरोनाच्या संकटामुळे प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे आमंत्रित करण्यात आले नव्हते, पण या वर्षी आमंत्रित करण्यात आली आहेत. 7 / 8२६ जानेवारी २०२३ रोजी देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे.8 / 8दिल्लीत कडाक्याच्या थंडीतही जवान परेडची तयारी करत असल्याचे दिसत आहे.