'बाबा का ढाबा'जवळील 'हा' फोटो होतोय व्हायरल, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 15:20 IST
1 / 12 कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात अनेक महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगारावर परिणाम झाल्याने अनेकांवर वाईट वेळ आल्याच्या घटना समोर आल्या आहेत2 / 12असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. दिल्लीमध्ये मालविया नगरमध्ये एका ८० वर्षीय आजोबांनी आपल्या पत्नीसह 'बाबा का ढाबा' (Baba Ka Dhaba) सुरू केला होता. 3 / 12कोरोनाच्या काळात मुलांनी मदत करण्यास नकार दिल्यानंतर हे जोडपं ढाबा चालवत आहे. एका यूट्यूबरने हा व्हिडीओ रेकॉर्ड करू शेअर केला होता. व्हिडीओमध्ये आजोबांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळतंय. 4 / 12लॉकडाऊनमध्ये ढाब्याला कमी प्रतिसाद मिळत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. अवघ्या काही तासांत हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी आजोबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 5 / 12 एका दिवसात #BabaKaDhaba ट्रेंड होऊ लागलं, आणि आज सकाळपासून या ढाब्यावर लोकांनी तुफान गर्दी केली.6 / 12या गर्दीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनाही विश्वास बसला नाही. 80 वर्षीय जोडप्याला मदत करण्यासाठी लोकांनी ढाब्यावर गर्दी केली. 7 / 12बाबाच्या ढाब्याची चिंताच जणू आता मिटली आहे, कारण या बाबाच्या ढाब्यावर जेवणासाठी मोठी गर्दी पडताना दिसून येतेय. 8 / 12जे लोक ढाब्यावर जाऊ शकत नव्हते त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून या वृद्धा दाम्पत्याला मदतीचा हात दिला आहे. तर, अनेकांनी रोख रक्कमही मदत म्हणून देऊ केली. 9 / 12 अभिनेत्री रविना टंडननेही व्हिडीओ शेअर करत चाहत्यांनाही 'बाबा का ढाबा'ला एकदा तरी भेट देण्याचे आवाहन केले आहे.10 / 12 रवीनाप्रमाणे सोनम कपूर, स्वरा भास्कर, सुनील शेट्टी हे कलाकारदेखील 'बाबा का ढाबा'च्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सोशल मीडियावर त्यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांसह शेअर करत इतरांनाही मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे11 / 12बाबांचे आसू दोन दिवसांतच हसूमध्ये परावर्तीत करण्याचं काम नेटीझन्सने केलंय. मात्र, या बाबांप्रमाणेच देशात असे अनेकज फुटपाथवरील विक्रेते आहेत. त्यांच्यासाठीही जवळीला नागरिकांनी विचार करुन तिथं गेलं पाहिजे. त्यांची सेवा घेतली पाहिजे. 12 / 12बाबांच्या ढाब्याजवळील गर्दीतील एका कचोरी व समोसे विकणाऱ्या सायकलचालकाचा फोटो आता व्हायरल होत आहे. अशांकडूनही आपण खरेदी केली पाहिजे, यांनाही मदतीचा हात दिला पाहिजे, असाच संदेश या फोटोतून देण्यात येतोय.