शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 00:27 IST

1 / 7
तुम्ही एखाद्या रस्त्याने चालत असाल आणि तो रस्ता अचानक गायब झाला तर... या जगात असा एक रस्ता आहे जो दिवसातून केवळ दोन तास दिसतो. तर उर्वरित वेळ गायब असतो. हा काही चमत्कार नाही तर ती निसर्गाची किमया आहे. हा रस्ता फ्रान्समध्ये असून त्याला पॅसेज डू गोईस (Passage du Gois) या नावाने ओळखले जाते.
2 / 7
पॅसेज डू गोईस (Passage du Gois) हा रस्ता दिवसातून दोन तास खुला असतो तर उर्वरित वेळ समुद्राच्या पाण्यात बुडून जातो. हा रस्ता नोइरमोटियर बेटाला फ्रान्सच्या मुख्य भूमीशी जोडतो. हा रस्ता पाहण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
3 / 7
नोइरमोटियर बेटाला फ्रान्सच्या मुख्य भूमीशी जोडणारा हा रस्ता अटलांटिक महासारगाच्या किनाऱ्यार आहे. हा रस्ता पॅसेज डू गोईस या नावाने ओळखला जातोत. स्थानिक फ्रेंच भाषेमध्ये गोईस याचा अर्थ चपला ओल्या करत रस्ता पार करणे असा होतो. स्थानिक लोक आणि पर्यटक या रस्यावरून चालत आणि वाहनांद्वारे जातात. मात्र हा रस्ता दिवसातून केवळ २ तासच खुला असतो.
4 / 7
सुमारे ४.५ किमी लांबीच्या या रस्त्याचा पहिला उल्लेख १७०१ मध्ये फ्रान्सच्या नकाशावर झाला होता. त्याआधी या बेटावर जाण्यासाठी नावांचा वापर होत असे. मात्र वर्षागणिक साठणाऱ्या गाळासोबत समुद्राचा तळ उंचावला आणि हा रस्ता तयार झाला.
5 / 7
पॅसेज डू गोईस हा रस्ता दिवसातून केवळ २ तास खुला असतो. तसेच जेव्हा भरती येते तेव्हा हा रस्ता पूर्णपणे बंद होतो. तसेच भरती आली की हा रस्ता तब्बल १३ फूट पाण्याखाली जातो. त्यामुळे या रस्त्याला अपघाती मार्ग म्हणूनही ओळखलं जातं.
6 / 7
मात्र येथील खास वैशिष्ट्यांमुळे हा रस्ता खास टुरिस्ट स्पॉट बनला आहे. दरवर्षी येथे हजारो लोक रस्ता पाहण्यासाठी येतात.
7 / 7
मात्र या रस्त्यावर चालणं हे जेवढं रोमांचक असतं. तेवढंच धोकादायकही असतं. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडू येथे सावध करणारे फलक जागोजागी लावण्यात आलेले आहेत. येथे फिरताना वेळेला फार महत्त्व आहे. अन्यथा एखादी व्यक्ती भरती आल्यावर रस्त्यात मधोमध अडकू शकते.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयFranceफ्रान्स