शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:59 IST

1 / 11
गेल्या आठवड्यात ज्यावेळी इस्रायली ड्रोर गोल्डस्टाईन भारतात आले तेव्हा त्यांच्या बॅगेत केवळ कपडे आणि आवश्यक वस्तूच नव्हत्या तर त्यांच्या दोन लहान मुली, प्रेमा (६) आणि अमा (४) यांच्यासाठी खेळणी आणि लहान भेटवस्तू देखील होत्या.
2 / 11
लवकरच त्यांची महिलेसोबत भेट होईल असं वाटत होतं. नुकत्याच कर्नाटकातील गोकर्णाजवळील एका गुहेत रशियन वंशाच्या नीना कुटीना यांच्यासह या मुली सापडल्या होत्या. पण प्रत्यक्षात ड्रोरला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला.
3 / 11
११ जुलै रोजी, रामतीर्थ टेकड्यांवर झालेल्या एका छोट्या भूस्खलनानंतर पोलिस त्या भागाची पाहणी करत असताना, त्यांना नीना आणि दोन्ही मुली एका गुहेत आढळल्या.
4 / 11
गेल्या तीन आठवड्यांपासून त्या तिथे एकांतवासात राहत होत्या. ज्यावेळी ड्रोरला ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब भारतात पोहोचला.
5 / 11
'मला कल्पना नव्हती की ते गुहेत राहत आहेत. मी तिथे पोहोचलो तेव्हा त्या आधीच निघून गेल्या होत्या, असं ड्रोर म्हणाला.
6 / 11
नीना कुटिना ही एक रशियन नागरिक आहे. ती २०१७ पासून भारतात राहत आहे. ती पहिल्यांदा बिझनेस व्हिसावर आली, नंतर २०१८ मध्ये नेपाळला गेली आणि नंतर गोकर्णाच्या जंगलात एकांतवासात राहण्याचा निर्णय घेतला.
7 / 11
ड्रोर आणि नीना यांची भेट गोव्यात झाली, तिथे ते अनेक वर्षे एकत्र राहिले. जरी नंतर त्यांचे नाते संपले तरी, ड्रोर दर सहा महिन्यांनी मुलांना भेटण्यासाठी भारतात येत राहिला.
8 / 11
'नीनाचे निसर्गावर खूप प्रेम आहे. मी तिच्या जीवन निवडींचा आदर करते, परंतु मुलांच्या सुरक्षिततेबद्दलची माझी चिंता देखील रास्त आहे,असं ड्रोरने सांगितले.
9 / 11
'मी इतक्या लांब प्रवासानंतर इथे पोहोचलो आहे, पण FRRO च्या परवानगीशिवाय मला भेटण्याची परवानगी नव्हती, असं ड्रोर म्हणाला.
10 / 11
ड्रोर आता बंगळुरूमध्ये आहे. येथे त्याने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे . मुलींना भेटण्याची परवानगी मिळण्यासाठी कायदेशीर बाबी पाहत आहे.
11 / 11
त्याला त्याच्या मुलींना इस्रायलला परत घेऊन जायचे आहे का असे विचारले असता तो म्हणाला, 'मला नक्कीच जायचे आहे, पण युद्धामुळे इस्रायलमधील परिस्थिती सध्या खूप गुंतागुंतीची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नीनाच्या संमतीशिवाय कधीही मुलींना घेऊन जाणार नाही. ती कोणताही निर्णय घेईल, मी त्याचा आदर करेन.'
टॅग्स :russiaरशियाBengaluruबेंगळूर