New Traffic Rule: आता ट्रॅफिक पोलीस थांबवू शकणार नाही तुमची कार, चेकिंगही नाही, असा आहे नवा नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 17:36 IST
1 / 6कार चालवणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. आता ट्रॅफिक पोलीस तुम्हाला विनाकारण अडवू शकणार नाहीत, तसेच तुमच्यावर दंडात्मक कारवाईही करू शकणार नाहीत. काही काळापूर्वी याबाबत एक सर्क्युलर ट्रॅफिक डिपार्टमेंटमध्ये जारी करण्यात आले आहे. 2 / 6आता ट्रॅफिक पोलीस बळजबरीने तुमची कार थांबवू शकणार नाहीत. नव्या नियमानुसार ट्रॅफिक पोलीस वाहनांची चेकिंग करणार नाहीत. ते केवळ वाहतुकीवर लक्ष ठेवतील. जर ट्रॅफिकच्या वेगावर काही परिणाम झाला, असेल तरच ते कुठल्याही गाडीची तपासणी करतील. 3 / 6सर्व वाहतूक पोलिसांना गाड्यांची तपासणी करणे थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचं कारण म्हणजे रस्त्यांवर ट्रॅफिक वाढत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना वाहनांच्या रहदारीवर लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. जर मोटार चालक वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असेल तर वाहतूक पोलीस त्यांना मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार आरोपी करू शकतात. 4 / 6वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांकडून संयुक्त नाकेबंदीदरम्यान, वाहतूक पोलीस केवळ वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाविरोधात कारवाई करतील, मात्र वाहनांची तपासणी करणार नाहीत. जय हे सल्ले सक्तीने लागू केले नाहीत तर संबंधित वाहतूक चौकीच्या वरिष्ठ निरीक्षकांना जबाबदार ठरवले जाईल. 5 / 6नेहमी दिसून येते की, ट्रॅफिक पोलीस केवळ संशयाच्या आधारावर कुठेही गाड्या थांबवून गाडीच्या आतील तपासणी सुरू करतात. त्यामुळे त्या रस्त्यावरील ट्रॅफिकवर परिणाम होतो. 6 / 6वाहतूक पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वाहतूक पोलिसांनी केवळ संशयाच्या आधारावर वाहनांची तपासणी करता कामा नये. तसेच वाहनांना थांबवता कामा नये. त्यांनी सांगितले की, आमचे जवान पूर्वीप्रमाणे वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाबाबत दंडात्मक कारवाई सुरू ठेवतील. तसेच नियमांचा भंग करणाऱ्यांना रोखतील.