शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमित शाह 12वी पास, तर गडकरी लॉ ग्रेज्यूएट; जाणून घ्या, किती शिकलेले आहेत मोदी सरकारमधील 'हे' शक्तीशाली मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 11:13 AM

1 / 10
नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रीमंडळ विस्तार नुकताच झाला. यात एकूण 43 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. आता मोदी मंत्रीमंडळात एकूण 78 मंत्री झाले आहेत. यात अनेक नवे चेहरे आहेत. (How much the top ministers in Narendra Modi cabinet are educated)
2 / 10
याशिवाय, या मंत्रीमंडळ विस्तारात अनेक मंत्र्यांचे मंत्रीमंडळही बदलण्यात आले आहेत. अशात, आम्ही आपल्याला मोदी कॅबिनेटमधील टॉप मंत्र्यांच्या शिक्षाणासंदर्भात सांगणार आहोत.
3 / 10
ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ही माहिती देण्यात येत आहे.
4 / 10
अमित शाह - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह 12वी पास आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रीपदाची धुराही देण्यात आली आहे.
5 / 10
राजनाथ सिंह- देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पोस्ट ग्रॅज्युएट आहेत.
6 / 10
निर्मला सितारमण - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी 1984 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून मास्टर ऑफ फिलॉसफी केले आहे.
7 / 10
अश्विनी वैष्णव - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हेही पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी व्हार्टन बिझनेस स्कूल, पेनसिल्वेनिया विद्यापीठ, अमेरिका येथून 2010मध्ये एमबीए केले आहे. त्यांच्याकडे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात रेल्वे मंत्री पद देण्यात आले आहे.
8 / 10
नीतिन गडकरी - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नीतिन गडकरी ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी लॉ केले आहे.
9 / 10
धर्मेंद्र प्रधान - देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हेही पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी 1990मध्ये उत्कल वद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स केले आहे.
10 / 10
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात धर्मेंद्र प्रधान यांना प्रेट्रोलियम मंत्री पदावरून हटावून आता त्यांच्याकडे शिक्षणमंत्री पद देण्यात आले आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारAmit Shahअमित शहाNitin Gadkariनितीन गडकरीnirmala sitharamanनिर्मला सीतारामनRajnath Singhराजनाथ सिंह