1 / 17देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,85,74,350 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,32,364 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2713 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,40,702 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 2 / 17देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशात कहर पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. 3 / 17काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत. 4 / 17उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊमध्ये एक धडकी भरवणारा प्रकार समोर आला आहे. एकाच रुग्णाला तीन प्रकारच्या फंगसचा संसर्ग झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. म्हणजेच व्हाइट फंगस, ब्लॅक फंगस आणि यल्लो फंगस अशा तिन्ही प्रकारच्या फंगचा एकाच वेळी संसर्ग झाला आहे. 5 / 17डॉक्टरांनी या रुग्णावर तीन तास शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रीयेनंतर या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार फैजाबाद येथे राहणारे सरस्वती यादव यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. 6 / 17यादव यांनी कोरोनावर मात केली मात्र यानंतर त्यांना चेहऱ्याजवळ वेदना होत असल्याने त्यांनी लखनऊमधील राजधानी रुग्णालयामध्ये उपचार घेतले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या रुग्णाला फंगसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.7 / 17डॉक्टरांनी इतरही चाचण्या केल्या आणि त्यामध्ये समोर आलेल्या रिपोर्टमधून रुग्णाला एकाच वेळी तिन्ही प्रकारच्या फंगसचा संसर्ग झाल्याचं उघड झालं. त्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. तीन तास चाललेल्या सर्जरीनंतर या रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. 8 / 17कोरोनावर मात केल्यानंतर एकाच रुग्णाला तिन्ही प्रकारच्या फंगसचा संसर्ग होण्याचं हे दुसरं प्रकरण आहे. याआधी गाझियाबादमधील एका रुग्णाला तिन्ही प्रकारच्या फंगसचा संसर्ग झाला होता. मात्र या रुग्णाला आधी कोरोना झालेला नव्हता.9 / 17राजधानी रुग्णालयातील डोकं आणि मानेची शस्त्रक्रीया करणाऱ्या विभागातील डॉक्टर अनुराग यांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजाबादमधील या रुग्णाला पोस्ट कोविड लक्षणं दिसून येत होती. 10 / 17रुग्णाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर तिन्ही प्रकारच्या फंगसची लागण झाल्याचं समोर आलं. कोरोना संसर्गाची लाट आलेली असतानाच देशामध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. 11 / 17म्युकोरमायकोसिस नावाने ओळखला जाणारा ब्लॅक फंगस सामान्यपणे अशा रुग्णांमध्ये दिसून येतो ज्यांना कोरोना उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणात स्टेरॉईड देण्यात येतात किंवा जे खूप काळ रुग्णालयामध्ये दाखल असतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 12 / 17देशातील 26 राज्यांत ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. तब्बल 20 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. रुग्णावर उपचार सुरू असतानाच उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. 13 / 17इंजेक्शनचा इतका मोठा तुटवडा आहे, की एकूण मागणीच्या दहा टक्केही इंजेक्शनही सध्या उपलब्ध नाहीत. केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी सोमवारी माहिती दिली की केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एम्फोटेरिसिन-बीचे अतिरिक्त 30,100 डोस पाठवले आहेत. 14 / 17एम्फोटेरिसिन-बीचा उपयोग ब्लॅक फंगसच्या उपचारात केला जातो. हा आजार नाक, डोळे आणि कधीकधी मेंदूवर वाईट परिणाम करतो. गौडा यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.सर्व राज्य/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना एम्फोटेरिसिन-बीचे 30,100 डोस पाठवले गेले आहेत. 15 / 17महाराष्ट्राला सर्वाधिक 5,900 आणि गुजरातला 5,630 उपलब्ध करुन दिले आहेत. यापाठोपाठ आंध्र प्रदेश 1,600, मध्य प्रदेश 1,920, तेलंगणा 1,200, उत्तर प्रदेश 1,710, राजस्थान 3,670, कर्नाटक 1,930 आणि हरियाणाला 1,200 दिले गेले आहेत. 16 / 17देशात अजूनही केवळ एक लाखाच्या आसपासचं एम्फोटेरिसिन-बीच्या उत्पादनाची क्षमता आहे. अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश, दादरा नगर हवेली, लडाख,लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, मिजोराम, सिक्किम आणि नागालँड वगळता इतर सर्व राज्यांमध्ये ब्लॅक फंगसचे रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.17 / 17ब्लॅक फंगसच्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑपरेशन करावं लागत आहे. मात्र तरीही त्यांचा जीव वाचवणं कठीण होत आहे. आतापर्यंत त्यांना अनेक रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत. काही रुग्ण सुरुवातीची लक्षणं दिसताच रुग्णालयात दाखल होत आहेत.