By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 16:29 IST
1 / 5हिमाचल प्रदेशातील शिमला येथील रहिवासी असलेल्या मोतीराम यांनी आर्थिक मदतीअभावी आपल्या दोन मुलींना आपल्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण मोतीराम हे पॅरालिसिसमुळे त्रस्त असून त्यांना कोणतेही काम करता येत नाही. त्यामुळे मोतीराम यांनी आपल्या दोन्ही मुलींना बालिका आश्रमात पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला.2 / 5दरम्यान, हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील रहिवासी रजत त्यांच्या मदतीसाठी पुढे आला. या तरूणाने मदतीचा हात म्हणून मोतीराम यांच्या खात्यात दोन दिवसांत सुमारे एक लाखाची आर्थिक मदत जमा केली. आता रजत कुमार दर महिन्याला मोतीराम यांना 15,000 एवढी रक्कम देतो आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलत आहेत.3 / 5रजत कुमार या तरूणाच्या वतीने मोतीराम यांना एक टीव्ही देखील देण्यात आला आहे. सध्या मोतीराम यांच्यावर पॅरालिसिसचे उपचार सुरू आहेत. मोतीराम यांनी रजतचे आभार मानले आहेत. 4 / 5रजतने केलेल्या आर्थिक मदतीमुळे आज मोतीराम यांच्या दोन्ही मुली त्यांच्यासोबत आनंदाने राहत आहेत. आता समाजातील अनेक लोक मोतिराम यांना विविध माध्यमातून मदत करत आहेत.5 / 5मोतीराम यांनी सांगितले की, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते पूर्ण बरे होताच कामावर परतणार आहेत.