शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता मोदी सरकार 'या' मोठ्या बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; जाणून घ्या काय परिणाम होणार

By कुणाल गवाणकर | Published: October 16, 2020 1:03 PM

1 / 11
तुमचं आयडीबीआय बँकेत (IDBI Bank) खातं असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आयडीबीआय बँकेतला आपला सर्व हिस्सा विकण्याची तयारी सरकारकडून पूर्ण झाली आहे.
2 / 11
कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला लवकरच मंजुरी मिळेल. यासाठी तयार करण्यात आलेल्या मसुद्यावरील सल्लामसलत पूर्ण झाली आहे.
3 / 11
बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि सरकारनं बँकेनं ९ हजार ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
4 / 11
आयडीबीआय बँकेतला सर्व हिस्सा विकण्यासाठी संबंधित मंत्रालयांशी चर्चा पूर्ण झाली आहे. एलआयसी आयडीबीआय बँकेतला आपला हिस्सा विकण्यास उत्सुक आहे.
5 / 11
आयडीबीआय बँकेत एलआयसीचा ५१ टक्के, तर सरकारचा ४७ टक्के हिस्सा आहे.
6 / 11
सरकारनं आयडीबीआय बँकेतला हिस्सा विकल्याचा ग्राहकांवर कोणताही थेट परिणाम होणार नाही. त्यांना मिळणाऱ्या सर्व सेवा कायम राहतील.
7 / 11
आयडीबीआय या सरकारी बँकेची स्थापना १९६४ मध्ये झाली. एलआयसीनं आयडीबीआयमध्ये २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून ५१ टक्के हिस्सा खरेदी केला.
8 / 11
यानंतर एलआयसी आणि सरकारनं आयडीबीआय बँकेला ९ हजार ३०० कोटी रुपये दिले. यात एलआयसीचा वाटा ४ हजार ७४३ कोटी रुपये इतका होता.
9 / 11
या वर्षात सरकारनं १० सरकारी बँका एकत्र येऊन ४ बँका तयार केल्या आहेत. मार्चमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं १० सरकारी बँकांचं एकत्रीकरण करून ४ बँका तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
10 / 11
या अंतर्गत पंजाब नॅशनल बँकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँकचं विलनीकरण करण्यात आलं. कॅनरा बँकेत सिंडिकेट बँकेचं विलनीकरण केलं गेलं.
11 / 11
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशनचं विलनीकरण करण्यात आलं. तर इंडियन बँकेत अलाहाबाद बँकेचं विलनीकरण करण्यात आलं.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLIC - Life Insurance Corporationएलआयसी