1 / 4केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीगचे आमदार परक्कल अब्दुल्ला यांनी सोमवारी चक्क मास्क आणि हातमोजे परिधान करून केरळ विधानसभेत प्रवेश केला. 2 / 4कुटिडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या परक्कल अब्दुल्ला यांनी कोझिकोडे जिल्ह्यात थैमान घालणाऱ्या निपाह व्हायरसबाबतचे गांभीर्य सभागृहासमोर आणण्यासाठी मास्क लावून विधिमंडळात प्रवेश केला. 3 / 4आमदार परक्कल अब्दुल्ला यांची ही कृती केरळ विधानसभेत लक्षवेधी ठरली. 4 / 4वटवाघुळांमार्फत फैलावणाऱ्या निपाह व्हायरसमुळे केरळमध्ये काही जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आजाराचा धोका अद्याप कायम आहे.