1 / 11देशभरात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ४.० सुरु झालं आहे. येत्या ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन असणार आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने सूट देत यामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. 2 / 11मागील २ महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरु आहे. आता लॉकडाऊन ४ सुरु झाल्याने अशा परिस्थितीत इतक्या दिवसापासून घरात बसलेल्या लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की त्यांच्या भागात दुचाकी, बस, टॅक्सी आणि ऑटो सुरु होणार काय?3 / 11सर्वप्रथम आपण केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्राने सध्या कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व (रेड, ऑरेंज आणि ग्रीन) प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवरील बंदी उठविली आहे. तथापि, खासगी वाहनांसाठी नियम आहेत. आता सर्व झोनमध्ये ऑटो, टॅक्सी, बस चालवू शकतात परंतु खासगी वाहनांसाठी नियम पाळावे लागतील. 4 / 11ग्रीन, ऑरेंज, रेड झोनमध्ये ऑटो-टॅक्सीसाठी प्रत्येकी १ अधिक १ प्रवासी वाहतूक, कारसाठी १ अधिक २ आणि दुचाकीसाठी १ अधिक १ (ग्रीन,ऑरेंज) तर रेड झोनमध्ये १ अशाप्रकारे वाहतूक करण्यात येईल. कंटेनमेंट झोनमध्ये वाहतुकीस परवानगी नाही5 / 11दरम्यान, आपल्या गाडीने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याबाबत केंद्राने स्पष्टपणे सांगितलं नाही. सूचना फक्त प्रवासी वाहनांसंदर्भात आहे. म्हणजेच खासगी वाहनांसह, जेव्हा आपल्याकडे विशेष पास असेल तेव्हाच आपण राज्याची सीमा ओलांडू शकतो.6 / 11जर राज्य सरकारांच्या सहमतीने दोन्ही राज्यांमध्ये बस आणि गाड्यांची वाहतूक सुरु होऊ शकते. म्हणजे जर तुम्हाला दिल्लीहून यूपी आणि यूपीहून दिल्लीत जायचं असेल तर दोन्ही राज्यांच्या सरकारांची यासाठी परवानगी हवी. 7 / 11देशात १४ दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे जो १८ मे पासून ३१ मे पर्यंत सुरु राहणार आहे. राज्यांना वाटत असेल तर राज्य बसेस सुरु करु शकतात. तसेच इतर राज्यांच्या सहमतीने आंतरराज्यीय बस वाहतूक सुरु केली जाऊ शकते.8 / 11प्रवासी वाहतूक सेवेत येणाऱ्यांमध्ये ऑटो, टॅक्सी, ग्रामीण सेवा, ई रिक्षासह ८ कॅटेगिरीतील वाहनांचा समावेश आहे. याबाबत राज्य सरकार निर्णय घेतील ते कशारितीने या वाहनांना परवानगी देण्यात येईल.9 / 11सरकारने शिफारशींमध्ये ऑटो, ई-रिक्षा, सायकल रिक्षा यामध्ये फक्त १ प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे तर टॅक्सी, कॅबमध्ये २ प्रवासी वाहतूक करु शकतात. तसेच शेअरींगचा पर्याय उपलब्ध नाही.10 / 11केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकार निर्णय घेतील. राज्यात कोणत्या प्रकारे वाहतूक सेवा सुरु करण्यात येईल त्याचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे.11 / 11देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंद (वैद्यकीय सेवा, सुरक्षा आणि एअर अॅम्ब्युलन्स वगळता) सर्व मेट्रो रेल्वे सेवा बंद राहतील. श्रमिक रेल्वे, मालगाड्या सुरुच राहतील. रेल्वेने यापूर्वी ३० जूनपर्यंत सर्व तिकीट रद्द केले आहेत.