शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय आखाडा परिषदेकडून 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 16:09 IST

1 / 7
(आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी) - अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे.
2 / 7
(सुखबिंदर कौर उर्फ राधे मां) अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणा-या 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर केली.
3 / 7
(गुरमीत राम रहीम सिंह) या ढोंगी बाबांची यादी सरकारला पाठवणार असल्याची माहिती आहे. जेणेकरून अशा ढोंगी बाबांविरोधात कारवाई केली जावी असा त्या मागचा उद्देश आहे.
4 / 7
(निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह) अखिल भारतीय अखाड़ा परिषदेने 'संत' उपाधी देण्यासाठी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 / 7
(रामपाल) संबंधित व्यक्तीची संपूर्ण पडताळणी करुन त्याचं आकलन करून नंतरच संत ही उपाधी बहाल केली जाणार आहे.
6 / 7
(स्वामी असीमानंद) एक-दोन भोंदू व्यक्तींमुळे सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे संत उपाधी देणयाआधी संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे.
7 / 7
ढोंगी बाबांच्या यादीत आसाराम बापू, राधे मां, गुरमीत राम रहीम सिंह याच्यासोबत सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता, ओमबाबा उर्फ विवेकानंद झा, निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह, रामपाल, आचार्य कुशमुनि, वृहस्पति गिरी, मलखान सिंह, इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ति द्विवेदी, स्वामी असीमानंद, ओम नमः शिवाय बाबा आणि नारायण साईं यांचा समावेश आहे.