CoronaVirus : मास्क न लावणं एका व्यक्तीला पडलं महागात, पोलिसांनी आकारला 5000 रुपयांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 00:00 IST
1 / 8देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणे आवश्यक आहे. 2 / 8काही राज्यामध्ये मास्क लावणे बंधनकारक केले आहे. तसेच, मास्क न लावल्यास दंड आकारण्यात येत आहे. केरळमधील एका व्यक्तीने मास्क लावले नाही, म्हणून पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत 5000 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.3 / 8दरम्यान, केरळमध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण आहेत. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्येच आढळला होता. त्यामुळे याठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे कठोर पालन करण्यात येत आहे.4 / 8लाकडाऊनचे कठोर नियम असतानाही केरळच्या वायनाडमध्ये मास्क न लावता बाहेर फिरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 5 / 8याबाबत येथील एसपी इलंगो यांनी सांगितले की, 'केरळ पोलीस अधिनियम (केपीए) 118 ई अंतर्गत त्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल आणि दंड आकारला जाईल. ती व्यक्ती मास्क न लावता घराबाहेर आली, म्हणून त्याला 5000 रुपये दंड आकारला आहे. '6 / 8याचबरोबर, ज्या व्यक्तीने मास्क घातला नाही. अशा व्यक्तीने या दंडाबाबत कोर्टात आव्हान दिले आणि यामध्ये तो दोषी आढळल्यास त्याला तीन वर्षांची शिक्षा किंवा दहा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असेही एसपी इलंगो यांनी सांगितले.7 / 8इतकेच नाही तर केरळमधील लॉकडाऊन नियम अतिशय कठोर करण्यात आले आहेत. एका दुकानदाराला एक हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. कारण, दुकानातील ग्राहकांसाठी हँड सॅनिटायझर न ठेवल्याबद्दल दुकानदाराला हा दंड आकारण्यात आला.8 / 8दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये आतापर्यंत 485 कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर कोरोनापासून 359 लोक बरे झाले आहेत.