कधी पीएम मोदींसोबत तर कधी रतन टाटांसोबत दिसलेली तरुणी कोण? लोक गुगलवर का शोधतायत तिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 17:52 IST
1 / 8सध्या गुगलवर अनेकांनी करिश्मा मेहता कोण आहे? शोधत आहेत. अनेकांनी या महिलेबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 2 / 8ह्यूमन ऑफ बॉम्बेच्या सीईओ करिश्मा मेहता यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर, यात त्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी Eggs Freeze केल्याचे जाहीर केले आहे. यानंतर गुगलवर लोकांनी तिच्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.3 / 8करिश्मा मेहता या ह्युमन ऑफ बॉम्बेच्या सीईओ आहेत. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांनी Eggs Freeze करण्याचा निर्णय घेतला. ह्युमन ऑफ बॉम्बे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय पेजपैकी एक आहे.4 / 8करिश्मा मेहता यांनी २१ डिसेंबर २०१४ रोजी ह्युमन्स ऑफ बॉम्बेची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचे वय २१ वर्ष होतं. त्यांच्या पेजद्वारे त्यांनी मुंबई आणि मुंबईकरांच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.5 / 8करिश्मा मेहता यांनी बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर बंगळुरूमधील एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी त्या ब्रिटनला गेल्या, तिथून त्यांनी अर्थशास्त्र आणि व्यवसायात पदवी मिळवली.6 / 8करिश्मा मेहता यांनी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. यानंतर त्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. फक्त २२ मिनिटांच्या मुलाखतीमुळे त्यांच्या करिअरची दिशा बदलली.7 / 8याआधी ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या संस्थापक करिश्मा मेहता यांचे नाव अनेक वेळा वादात सापडले आहे. त्यांच्या स्टोरीटेलिंग प्लॅटफॉर्मने पीपल ऑफ इंडिया (POI) विरुद्ध त्यांच्या कंटेंटच्या कॉपीराइट उल्लंघनासाठी खटला दाखल केल्यानंतर त्या वादात सापडल्या होत्या.8 / 8मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये करिश्मा मेहता यांची संपत्ती ३ मिलियन डॉलर म्हणजेच २६,१४,३१,५२९ रुपये एवढी आहे.