शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalpana Chawla Birth Anniversary: बालपणीचे स्वप्न उराशी घेऊन कल्पना चावला अंतराळात झेपावली खरी, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 09:38 IST

1 / 10
17 मार्च 1962 च्या दिवशी भारताची महान कन्या कल्पना चावलाचा जन्म झाला होता. कल्पनाने जगभरात भारताची मान उंचावली आहे. तिच्या जन्मतारखेबाबतही एक रोचक किस्सा आहे.
2 / 10
कल्पना चावलाचा जन्म 17 मार्च 1962 लाच झालेला परंतू कागदोपत्री तिचा जन्म 1 जुलै 1961 असा नोंदविला गेला.
3 / 10
याला एकच कारण होते शाळेत तिचा प्रवेश विनासंकट व्हावा. जुन्या काळी वर्ष वाया जाऊ नये म्हणून जन्म तारखांमध्ये असा फेरफार केला जायचा.
4 / 10
कल्पना यांचा जन्म हरियाणाच्या करनालमध्ये झाला होता. तिच्या वडिलांचे नाव बनारसी लाल चावला आणि आईचे नाव संजयोती आहे. कल्पना या घरातील सर्वात छोट्या होत्या, मात्र त्यांचे काम एवढे मोठे आहे की, आजही जगभरातील लोक त्यांची आठवण काढत असतात.
5 / 10
कल्पना यांचे प्राथमिक शिक्षण करनालच्या टागोर बाल निकेतनमध्ये झाले. जेव्हा त्या थोड्या मोठ्या झाल्या तेव्हा त्यांनी वडिलांना सांगितले की, त्यांना इंजिनिअर व्हायचे आहे.
6 / 10
कल्पना चावला नेहमी त्यांच्या वडिलांना विचारायच्या की अंतराळ यान काय असते. ते आकाशात कसे झेपावते? मी देखील उडू शकते का? असे ते प्रश्न असायचे. छोट्या कल्पनेचे प्रश्न मोठे होते. मात्र, अनेकदा तिच्या प्रश्नांना हसून टाळले जायचे. कारण कल्पना छोटी होती.
7 / 10
कल्पनाची पाऊले पुढे पडत राहिली आणि ती 1982 मध्ये अमेरिकेला गेली. कल्पना यांनी टेक्सास विद्यापीठातून एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स डिग्री घेतली.
8 / 10
कल्पना या पहिल्या भारतीय महिला होत्या ज्या नासाच्या अंतराळवीर म्हणून सहभागी झाल्या. परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच लिहिले होते.
9 / 10
1 फेब्रुवारी 2003 रोजी अंतराळ केंद्रावर 16 दिवस राहिल्यानंतर जेव्हा कल्पना चावला त्यांच्या 6 अन्य साथीदारांसोबत पृथ्वीवर परतत होत्या तेव्हा त्यांच्या यानाला अपघात झाला. या अपघातात कल्पना यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचा मृत्यू झाला.
10 / 10
या अपघातानंतर फ्लोरिडाच्या अंतराळ केंद्रावरील झेंडा अर्ध्यावर आणण्यात आला होता. छोट्या वयात मोठी झेप घेतलेली कल्पना आजही भारतीयांच्याच नाही तर जगाच्या हृदयात जिवंत आहे.
टॅग्स :NASAनासा