शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 11:39 IST

1 / 7
कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. प्रकृतीमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा देणारे ते पहिले उपराष्ट्रपती ठरले आहेत.
2 / 7
जगदीप धनखड यांनी ऐन अधिवेशनात अचानक हा राजीनाम्याचा बॉम्ब टाकल्याने राजकारणात खळबळ उडाली. धनखड यांच्यापूर्वीही काही व्यक्तींनी उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ होण्यापूर्वी राजीनामा दिला होता.
3 / 7
उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच राजीनामा देणारे पहिले व्यक्ती होते व्ही.व्ही. गिरी. व्ही.व्ही. गिरी १९६७ ते १९६९ या काळात उपराष्ट्रपती होते. १९९९ मध्ये राष्ट्रपती जाकीर हुसैन यांचे निधन झाल्यानंतर व्ही.व्ही. गिरींनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम केले होते.
4 / 7
१९६९ मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी व्ही.व्ही. गिरी यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती. उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी राजीनामा देणारे ते पहिले व्यक्ती होते.
5 / 7
व्ही.व्ही. गिरी यांच्यानंतर कार्यकाळ संपवण्यापूर्वी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देणारे व्यक्ती होते भैरोसिंह शेखावत! २००७ मध्ये शेखावत यांनी प्रतिभा पाटील यांच्या विरोधात राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती.
6 / 7
भैरोसिंह शेखावत यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली आणि निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी पहिल्यांदाच उपराष्ट्रपती पद २१ दिवस रिक्त होते. त्यानंतर मोहम्मद हमीद अन्सारी हे उपराष्ट्रपती बनले होते.
7 / 7
उपराष्ट्रपती आर. वेंकटरमन, शंकर दयाल शर्मा आणि के.आर. नारायण यांनीही उपराष्ट्रपती पद भूषवले. त्यांनीही उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली आणि जिंकले. हे तीन नेते असे आहेत, जे आधी उपराष्ट्रपती आणि नंतर राष्ट्रपती बनले होते. एक नेते असे आहेत ज्यांचे उपराष्ट्रपती असताना निधन झाले. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. कृष्णकांत यांचे उपराष्ट्रपती असताना २७ जुलै २००२ रोजी निधन झाले होते.
टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडParliamentसंसदBJPभाजपाPresidentराष्ट्राध्यक्षPoliticsराजकारण