ब्यूटी विद ब्रेन! बॉलिवूडमध्ये काम केलं, अभ्यासामध्ये गोल्ड मेडल मिळवलं; कोचिंगशिवाय झाली IPS
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 17:27 IST
1 / 10प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहतनीच्या जोरावर कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करता येते. अनेक जण स्पर्धा परीक्षा देतात. त्यामध्ये काही लोकं अपयशी ठरतात. तर काहींना घवघवीत यश मिळतं अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. 2 / 10मध्य प्रदेशातील रहिवासी आयपीएस सिमाला प्रसाद या ब्यूटी विद ब्रेनचं एक उत्तम उदाहरण आहेत. सरकारी नोकरीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासोबतच त्याची बॉलिवूडमध्येही ख्याती पसरली आहे. आयपीएस सिमाला प्रसादची यांची यशोगाथा जाणून घेऊया...3 / 10IPS सिमाला प्रसाद मध्य प्रदेशातील भोपाळच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 08 ऑक्टोबर 1980 रोजी भोपाळ येथे झाला होता. त्यांचे वडील डॉ. भागीरथ प्रसाद हे 1975 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.4 / 10दोन विद्यापीठांचे कुलगुरू आणि 2014 ते 2019 या काळात सिमाला प्रसाद यांचे वडील मध्य प्रदेशातील भिंदचे लोकसभा सदस्य होते. सिमाला यांची आई मेहरुन्निसा परवेझ या एक सुप्रसिद्ध साहित्यिका आहेत.5 / 10भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सिमाला प्रसाद यांनी सेंट जोसेफ कोएड स्कूलमध्ये त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घेतले. यानंतर, त्यांनी बी.कॉम आणि बर्कतुल्लाह युनिव्हर्सिटी, भोपाळ यांच्याकडून समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 6 / 10विद्यापीठाच्या परीक्षेत टॉप केलं म्हणून त्यांचा गोल्ड मेडलने गौरव करण्यात आला आहे. महाविद्यालयीन अभ्यास पूर्ण केल्यानंतर, सिमालाने मध्य प्रदेश सार्वजनिक सेवा आयोगाच्या एमपी पीएससी परीक्षेस पात्र ठरल्या.7 / 10सिमाला यांचे पहिले पोस्टिंग डीएसपी म्हणून होते. या सरकारी नोकरी दरम्यान त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यासाठी, सिमाला यांनी कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही. त्यांनी स्वत: च्या अभ्याल करून नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्या 2010 बॅचच्या अधिकारी आहे. 8 / 10आयपीएस सिमाला प्रसाद देशातील सर्वात सुंदर महिला अधिकाऱ्यांमधील एक आहेत. लहानपणापासूनच त्यांना नृत्य आणि अभिनयात खूप रस होता. शालेय महाविद्यालयीन दिवसांमध्ये नाटक इत्यादींमध्ये भाग घ्यायच्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.9 / 10आयपीएस सिमाला प्रसाद देशातील सर्वात सुंदर महिला अधिकाऱ्यांमधील एक आहेत. लहानपणापासूनच त्यांना नृत्य आणि अभिनयात खूप रस होता. शालेय महाविद्यालयीन दिवसांमध्ये नाटक इत्यादींमध्ये भाग घ्यायच्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.10 / 10आयपीएस सिमाला प्रसाद देशातील सर्वात सुंदर महिला अधिकाऱ्यांमधील एक आहेत. लहानपणापासूनच त्यांना नृत्य आणि अभिनयात खूप रस होता. शालेय महाविद्यालयीन दिवसांमध्ये नाटक इत्यादींमध्ये भाग घ्यायच्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.