शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:07 IST

1 / 7
भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंगला (RAW) नवा प्रमुख मिळाला आहे. पराग जैन यांची 'रॉ'च्या (RAW) नवीन प्रमुखपदी निवड झाली आहे. पराग जैन हे पंजाब कॅडरचे १९८९ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
2 / 7
'रॉ' प्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. ते रवी सिन्हा यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे. सध्या पराग जैन एव्हिएशन रिसर्च सेंटरचे (ARC) नेतृत्व करत आहेत. त्यांना पाकिस्तानमधील घडामोडींचे तज्ज्ञ मानले जाते.
3 / 7
या रिसर्च सेंटरने 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानी सशस्त्र दलांबद्दल गुप्त माहिती गोळा करून महत्त्वाची भूमिका बजावली होती.
4 / 7
पराग जैन यापूर्वी चंदीगडचे एसएसपी (वरिष्ठ पोलीस अधीक्षक) म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी कॅनडा आणि श्रीलंकेमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणूनही सेवा दिली आहे.
5 / 7
पराग जैन यांची जम्मू आणि काश्मीरमध्येही नियुक्ती करण्यात आली होती, जिथे त्यांनी संघर्षग्रस्त केंद्रशासित प्रदेशातील दहशतवादविरोधी धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ते सोमवारी रवी सिन्हा यांचा पदभार स्वीकारतील.
6 / 7
'रॉ'ची स्थापना २१ सप्टेंबर १९६८ रोजी झाली होती. या संस्थेचे पहिले प्रमुख आर. एन. काव होते. 'रॉ'चे मुख्य काम परदेशात भारताच्या विरोधात कोणताही कट रचला जात नाहीये ना, याची माहिती मिळवणे हे आहे.
7 / 7
याशिवाय, 'रॉ' गुप्त मोहिमांनाही (Secret Missions) यशस्वी करते. 'रॉ'ची जबाबदारी थेट पंतप्रधानांवर असते आणि 'रॉ' प्रमुख आपला दैनंदिन अहवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना (National Security Advisor) देतात.
टॅग्स :Indiaभारत