IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:05 IST
1 / 9आंध्र प्रदेशातील तिरुपतीहून तेलंगणाची राजधानी हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात अचानक बिघाड झाला. 2 / 9तिरुपतीहून उड्डाण घेतल्यानंतर विमान सुमारे ४० मिनिटे आकाशात घिरट्या घालत राहिले आणि नंतर विमानाचे तिरुपतीमध्येच आपत्कालीन लँडिंग करावे लागले.3 / 9विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ते हैदराबादकडे नेण्यात आले नाही. यावेळी विमानात असलेले प्रवासीही खूप घाबरले होते. ४० मिनिटांनंतर विमान तिरुपतीमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले.4 / 9तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरबस फ्लाइट A321neo ने रविवारी संध्याकाळी ७.४२ वाजता तिरुपती विमानतळावरून उड्डाण केले. एअर ट्रॅफिक ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 नुसार, उड्डाणानंतर सुमारे ४० मिनिटांनी, रात्री ८.३४ वाजता तिरुपती विमानतळावर विमान परत उतरवण्यात आले.5 / 9फ्लाईटराडार24 नुसार, विमान तिरुपतीतील वेंकटनगरीला गेले आणि तिथून यू-टर्न घेतला. यानंतर, विमान ४० मिनिटे हवेत घिरट्या घालत राहिले आणि त्यानंतर विमान तिरुपती विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.6 / 9इंडिगोच्या वेबसाइटनुसार, विमानाने तिरुपतीहून संध्याकाळी ७.२० वाजता उड्डाण केले आणि हैदराबादला रात्री ८.३० वाजता पोहोचले.7 / 9तिरुपतीहून हैदराबादला जाणारी शेवटची विमानसेवा रद्द करण्यात आली.8 / 9विमान रद्द झाल्यानंतर प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये प्रवाशी इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत.9 / 9इंडिगोने अजूनही विमानाशी संबंधित कोणतीही औपचारिक माहिती शेअर केलेली नाही.