ट्रेनमध्ये सिगारेटचे सेवन केल्यास आता जेलची शिक्षा होणार नाही, तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 15:58 IST
1 / 8नवी दिल्ली : रेल्वे अनेक जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने कॅबिनेटला जो प्रस्ताव पाठविला आहे, त्यात भारतीय रेल्वे अधिनियम १९८९ च्या दोन कायद्यांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे.2 / 8प्रस्तावानुसार, IRA च्या कलम १४४ (२) मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. या व्यतिरिक्त जे लोक रेल्वे किंवा स्टेशनमध्ये बीडी, सिगारेटचे सेवन करतात, त्यांनाही तुरूंगात पाठविले जाणार नाही तर फक्त दंड आकारला जाणार आहे.3 / 8भारतीय रेल्वे अधिनियमच्या कलम १६७ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जर ही सुधारणा मान्य केली तर रेल्वे, रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा स्टेशन परिसरात धूम्रपान करणार्यांना तुरूंगात शिक्षा ठोठावली जाणार नाही. तर त्यांच्याकडून फक्त दंड आकारला जाणार आहे.4 / 8सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार आता उपयुक्त नसणाऱ्या अशा अनेक कायद्यांमध्ये बदल किंवा रद्द करण्याचा विचार करीत आहे. 5 / 8म्हणजेच, ज्या कायद्याद्वारे यंत्रणेत अडचणी येत आहेत, त्यामध्ये बदल करण्याचा विचार सुरु आहे. तसेच, अशा प्रकारच्या अनावश्यक कायद्यांची यादी विविध मंत्रालये व विभागांकडून मागविली जात आहे.6 / 8कोरोना संकट काळात रेल्वेला तिकिट बुकिंगमुळे झालेल्या उत्पन्नाहून अधिक परतावा प्रवाशांना द्यावा लागला. भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले असेल. 7 / 8कोरोना संकटामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रेल्वेच्या प्रवासी श्रेणीतून मिळणाऱ्या उत्पन्नात १०६६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.8 / 8या दरम्यान रेल्वेच्या प्रवाशांना तिकिट भाडे परत केल्यामुळे एप्रिलमध्ये ५३२.१२ कोटी, मे महिन्यात १४५.२४ कोटी रुपये आणि जूनमध्ये ३९०.६ कोटी रुपयांचे नुकसान झाले.