Indian Army: चीनच्या सीमेवर तैनात जवानांना मिळाले नवे घातक हत्यार, एका वारात उडतील शत्रूच्या विमानाच्या ठिकऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 13:54 IST
1 / 10भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील गोगरा भागातून आपापले सैन्य मागे घेतले आहे. दरम्यान, येथील ग्राऊंड झीरोवर भारताचे जवान देशाच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. 2 / 10गेल्या एका वर्षापासून अधिक वेळेपासून लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनचे सैन्य युद्धाच्या मोर्चावर तैनात आहेत. लेहपासून १५० किमी अंतरावर पूर्व लडाखमधील चुशूलच्या हद्दीजवळ न्योमा येथे भारतीय जवानांनी चीनच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली आहे. 3 / 10पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ फॉरवर्ड बेसवर भारतीय लष्कराने नेगेव्ह लाइट मशीन गन, टेवर-२१ आणि एके-२७ असॉल्ट रायफलांनी सज्ज असलेल्या गरुड स्पेशल फोर्सच्या जवानांना तैनात केले आहे. 4 / 10याशिवाय न्योमा येथे शत्रूच्या विमानांना आणि हेलिकॉप्टरच्या ठिकऱ्या उडवण्यासाठी रशियन बनावटीचा मेन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टिम तैनात करण्यात आला आहे. या एअर डिफेन्स सिस्टिमने सज्ज भारतीय हवाई दलाचे जवान फॉरवर्ड बेसवर तैनात आहेत. वेगाने जाणारी विमाने आणि हेलिकॉप्टर्सना ही सिस्टिम उद्ध्वस्त करू शकते. 5 / 10लेहपासून २०० किमी अंतरावर पूर्व लडाखच्या सीमेवर भारतीय लष्कराचे जवान आणि टँक चीनला पळता भुई थोडी करण्यासाठी सज्ज आहेत. १६ हजार ते १८ हजार फूट उंचीवर शून्याखाली तापमानामध्ये भारतीय लष्कराचे जवान तैनात आहेत. 6 / 10सध्या भारत आणि चीनच्या सैन्याने आपापल्या जवानांना माघारी बोलावले असले तरी भारतीय लष्कराचे इरादे स्पष्ट आहेत. ते कुठल्याही आघाडीवर चीनविरोधातील आपल्या तयारीमध्ये कुठलीही कुचराई ठेवण्यास तयार नाही आहेत. 7 / 10न्योमामध्ये सिंधू नदीच्या काठावर हजारो मैल पसरलेल्या खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराचे टी-९० टँक भीष्म आणि बीएमपी चीनविरोधात गर्जना करत आहेत. आवश्यकता भासल्यावर हे टँक चीनच्या हद्दीत घुसून त्यांच्या तळांना उद्ध्वस्त करू शकतात. 8 / 10गेल्या एक वर्षापासून अधिकच्या काळापासून पूर्व लडाखमध्ये भारताने जगातील सर्वात अचून टँक म्हणून लौकिक असलेल्या टी-९० भीष्म रणगाड्यांची तैनाती केली आहे. तसेच त्याची तैनाती म्हणजे भारताचे सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे. 9 / 10टी-९० भीष्म टँकमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याल्या रोखणारे कवच आहे. यामध्ये शक्तिशाली एक हजार हॉर्स पॉवरचे इंजिन आहे. हे टँक एकावेळी ५५० किमीपर्यंतचे अंतर कापू शकतात. या टँकचे वजन हे ४८ टन आहे. तसेच जगातील सर्वात हलक्या टँकपैकी हा एक आहे. तसेच रात्र असो वा दिवस हा टँक शत्रूशी लढण्यासाठी सक्षम आहे. 10 / 10याबरोबरच भारतीय लष्कराचे हजारो जवान येथील कठीण परिस्थितीत चीन घुसखोरी करण्याची शक्यता असलेल्या प्रत्येक पर्वत आणि खोऱ्यात तैनात आहे, गलवानमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर आता भारत चीनला कुठलीही संधी देण्याच्या मनस्थितीत नाही आहे.