...तर सर्वसामान्यांचं सैन्यात जाण्याचं स्वप्न होणार साकार; लष्कर करतंय मोठा विचार By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 4:49 PM
1 / 11 सैन्यात जाऊन देशसेवा करावी, असा विचार लहानपणी एकदा तरी प्रत्येकाच्या मनात आलेला असतो. मात्र नंतर हा विचार मागे पडतो. अशा अनेकांचं स्वप्न आता साकार होण्याची शक्यता आहे. 2 / 11 सैन्यातील शिस्त, त्यांचा गणवेश अनेकांना भुरळ घालतो. जवान कुठेही दिसला तरी मनात आदराची भावनाच उमटते. 3 / 11 आपणही सैन्यात जायला हवं होतं, असा विचार जवानांना पाहिल्यावर मनात येतो. असा विचार मनात येणाऱ्या अनेकांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची दाट शक्यता आहे. 4 / 11 भारतीय लष्कर सर्वसामान्य नागरिकांना सैन्यामध्ये सेवा करण्याची संधी देऊ शकतं. सर्वसामान्य नागरिकांना तीन वर्ष टूअर ऑफ ड्युटी देण्याच्या प्रस्तावावर सैन्याचा विचार सुरू आहे. 5 / 11 सर्वसामान्य भारतीयांना टूअर ऑफ ड्युटीच्या माध्यमातून लष्करात काम करण्याची संधी देण्याचा विचार असल्याचं वृत्त नवभारत टाईम्सनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. लष्कराच्या प्रवक्त्यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. 6 / 11 भारतीय लष्कराला देशातल्या सर्वोत्तम प्रतिभेला सैन्यात स्थान द्यायचं आहे. टूअर ऑफ ड्युटीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास त्याला गती मिळेल. 7 / 11 सध्याच्या घडीला शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून लष्करात रूजू होणाऱ्यांना कमीत कमी १० वर्षे देशसेवा करावी लागते. यापेक्षा कमी कार्यकाळ असलेली सेवा सध्या तरी उपलब्ध नाही. 8 / 11 लष्करातील वरिष्ठ अधिकारी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील तरतुदींचा फेरविचार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 9 / 11 शॉर्ट सर्व्हिस कमिशनमधील तरतुदींमध्ये बदल केला गेल्यास जास्तीत जास्त तरुण याकडे आकर्षित होतील, असं लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटतं. 10 / 11 भारतीय सैन्याला गेल्या अनेक वर्षांपासून अधिकाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लवकरात शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 11 / 11 आधी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये ५ वर्षांच्या किमान सेवेची तरतूद होती. मात्र त्यानंतर ती १० वर्षे करण्यात आली. आणखी वाचा