शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 11:26 IST

1 / 6
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केल्याने पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले आहे. अशातच आता भारतही पाकिस्तानवर अशीच कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतासाठी हवाई क्षेत्र बंद करणारे पाकिस्तान भारताचे हवाई क्षेत्र मात्र वापरत आहे. ते आणि सागरी मार्ग पाकिस्तानसाठी बंद होण्याची शक्यता आहे.
2 / 6
भारताने पाकिस्तानी विमान कंपन्यांना हवाई क्षेत्र बंद केले तर मोठा फेरफटका मारून या विमानांना जावे लागणार आहे. यामुळे आधीच तोट्यात असलेल्या पाकिस्तानी एअरलाईनला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. कारण त्यांना चीन किंवा श्रीलंकेवरून जावे लागणार आहे.
3 / 6
पाकिस्तानी एअरलाईन पीआयएची विमाने क्वालालंपूर सारख्या दक्षिण आशियाई शहरांपर्यंत जातात. सध्या ही विमाने भारताच्या हवाई क्षेत्रातून जात आहेत. भारताने पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करण्याचा विचार सुरु केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. यामुळे या विमानांना मोठा फेरा मारून जावे लागणार आहे.
4 / 6
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) मलेशिया, सिंगापूर आणि थायलंड सारख्या आग्नेय आशियाई देशांपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर करते. याचबरोबर भारतीय बंदरांमध्ये पाकिस्तानी जहाजांनाही येण्यास बंदी घातली जाणार आहे.
5 / 6
युरोपियन एअर सेफ्टी एजन्सी (EASA) ने सुरक्षेच्या कारणास्तव 30 जून 2020 रोजी PIA ला युरोपमध्ये उड्डाण करण्यास बंदी घातली होती. ही बंदी २९ नोव्हेंबर २०२४ रोजी उठवण्यात आली होती. आता भारत पीआयएवर अशी बंदी घालणार आहे.
6 / 6
यापूर्वी भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. पीआयएने श्रीलंकेच्या हवाई क्षेत्रावरून विमाने नेली होती. तेव्हाची आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. पीआयए भीषण आर्थिक तंगीमध्ये आहे. तसेच ही बंदी प्रदीर्घ असण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पीआयएला या देशांना विमानसेवा देणे कठीण जाणार आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारत