शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:15 IST

1 / 10
भारताने व्यापक तयारी केली आहे. ईशान्येकडील भागात हवाई दलाच्या सरावांसाठी भारताने अतिरिक्त सूचना म्हणजेच NOTAM जारी केला आहे. हे सराव १३ ते २० नोव्हेंबर या काळात चालतील. हा अभ्यास चीन, बांगलादेश आणि भूतानच्या सीमेपर्यंत असेल.
2 / 10
भारताच्या या युद्ध सरावामुळे चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तणाव निर्माण होईल, कारण भारत राफेल आणि सुखोई-३० सारखी लढाऊ विमानांची ताकद या सरावातून दाखवून देणार आहे.
3 / 10
भारताच्या नवीनतम NOTAM ने ईशान्येकडील भारतीय हवाई दलाच्या सरावांना १३-२० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवले ​​आहे. हा NOTAM भारताचा चिकन नेक मानल्या जाणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरवर काही दिवसांसाठी हवाई क्षेत्र राखीव ठेवतो. हा कॉरिडॉर या प्रदेशाला मुख्य भूमीशी जोडणारा २२ किलोमीटर रुंद कॉरिडॉर असून तो गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे.
4 / 10
संरक्षण विश्लेषक लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) जे.एस. सोधी यांच्या मते, भारत तिन्ही आघाड्यांवर लष्करी सराव करत आहे. पश्चिम, पूर्व आणि ईशान्य सीमेवर पहिल्यांदाच एकाच वेळी सराव करणे म्हणजे भारत दोन आघाड्यांवर युद्धाची तयारी करत आहे.
5 / 10
हे मल्टी डोमेन वॉरच्या उद्देशाने केले जात आहे. २०३० नंतर चीन आणि पाकिस्तान संयुक्तपणे भारतावर हल्ला करू शकतात असं बोललं जाते. या वर्षी १७ मार्च रोजी जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेले विधान, दोन आघाड्यांवर युद्ध हे भारतासाठी भाकीत नाही, तर एक वास्तव आहे.
6 / 10
चीन आधीच युद्धाची तयारी करत आहे. ते एकाच वेळी तीन कामे करत आहे, जे पूर्णत्वास येण्याची वेळ २०३० आहे. पहिले या वर्षी जुलैमध्ये सुरू झालेले मेडोक धरणाचे बांधकाम २०३० मध्ये पूर्ण होईल.
7 / 10
दुसरे, या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झालेले तिबेट-शिनजियांग रेल्वे मार्ग २०३० मध्ये पूर्ण होईल. तिसरे, २०० युद्धनौका, १५ अणु पाणबुड्या आणि दोन विमानवाहू जहाजांसाठी एक मोठे यार्ड बांधत आहे, जे २०३० मध्ये पूर्ण होईल. या वेळापत्रकावरून चीन भारताविरुद्ध मोठी तयारी करत आहे. ते शांतपणे यात काम करत आहेत हे दिसून येते.
8 / 10
लेह-लडाख प्रदेश असो किंवा अरुणाचल प्रदेश, चीनशी असलेल्या भारताच्या सर्व सीमा अत्यंत संवेदनशील आहेत. म्हणूनच भारत या क्षेत्रांना लक्षात घेऊन हे सराव करत आहे असं संरक्षण तज्ज्ञांनी म्हटलं आहे. भारताने बंगालच्या उपसागरात अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे.
9 / 10
भारतीय हवाई दलाने अलीकडेच ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत एक नोटम जारी केला आहे, ज्यामध्ये लष्कर, हवाई दल आणि नौदल ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत एक लष्करी सराव करत आहेत. या सरावाला 'त्रिशूल' असे नाव देण्यात आले आहे असं म्हटलं होते.
10 / 10
या सरावादरम्यान सीमावर्ती भागात नो-फ्लाय झोन असेल. हा सराव जैसलमेर क्षेत्रापासून गुजरातच्या सर क्रीक क्षेत्रापर्यंत होईल. हवाई दलाने जारी केलेल्या नोटममध्ये ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान वेस्टर्न एअर कॉरिडॉरमध्ये उड्डाणांविरुद्ध इशारा देण्यात आला होता.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलchinaचीनIndiaभारतPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेशIndian Armyभारतीय जवान