यूपीएससी टॉपर आयएएसने स्वतःच्या वडिलांच्या निवृत्ती पत्रावर केली होती स्वाक्षरी; प्रेयसीला दिलं श्रेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:52 IST
1 / 7केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी २०१८च्या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिले आले होते. कनिष्क कटारिया हे मूळचे राजस्थानचा असून त्यांनी आयआयटी मुंबईमधून बी टेकचे शिक्षण पूर्ण केलं. 2 / 7कनिष्क यांनी काही वर्ष दक्षिण कोरियात नोकरी केली आणि ते भारतात परतले. भारतात परतल्यावर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली आणि ते देशात पहिले आले. 3 / 7एखाद्या व्यक्तीला यश मिळालं की त्याचे श्रेय फक्त आई-वडिलांना किवा. जवळच्या मित्र-मैत्रिणींना दिलं जातं. पण कनिष्क यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शिक्षकांसोबत त्यांच्या प्रेयसीला देखील दिलं. त्यामुळेच ते तरुणांमध्ये देखील चर्चेचा विषय ठरले.4 / 7कनिष्क यांना यूपीएससीची तयारी करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना सांगितलं की, या जगात आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर कोणत्याही परीक्षेत तुम्ही घवघवीत यश संपादन करू शकता. या परीक्षेला एखाद्या साध्या परीक्षेप्रमाणे पहा. या परीक्षेचा जास्त ताण घेऊ नका.5 / 7इतकंच काय तर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी संवरमल वर्मा यांच्या निवृत्तीसंदर्भातील फाइलवर त्यांचा मुलगा कनिष्क कटारिया यांनी स्वाक्षरी केली होती. कनिष्क कटारिया सध्या कार्मिक विभागात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी पिता-पुत्र दोघांचेही एकत्र प्रमोशन झालं होतं.6 / 7संवरमल वर्मा हे ३० सप्टेंबर २०२४ रोजी विभागीय आयुक्त, भरतपूर या पदावरून निवृत्त झाले. त्यांचा मुलगा कनिष्क कटारिया हे २०१९च्या बॅचचे आयएएस ऑल इंडिया रँक वन आहेत. सध्या राजस्थान सरकारच्या कार्मिक विभागात सहसचिव आहेत.7 / 7कनिष्क कटारिया हे अशा तरुणांपैकी एक आहे ज्यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो रुपयांची नोकरी सोडली आणि भारतीय प्रशासकीय सेवेची निवड केली. कनिष्क यांनी २०१८ मध्ये नशीब आजमावले आणि पहिला क्रमांक मिळवला.