शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"मला जगातील सर्वांत सुंदर म्हणणे चांगले वाटतेय, पण साध्वी..."; इन्फ्लुएंसर हर्षा रिछारिया नेमकी आहे तरी कोण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 14:02 IST

1 / 7
महाकुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवशी एका सुंदर साध्वीने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. माध्यमांमधून तिची मुलाखत व्हायरल होऊ लागताच ती साध्वी नाही तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याचे समोर आले होते. यावरून ती ट्रोलही होऊ लागली होती. यावरून तिची प्रतिक्रिया आली आहे.
2 / 7
महाकुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे दीड कोटी भाविक, साधुंनी महास्नान केले आहे. अशातच महाकुंभ मेळ्यात सोमवारी एका सुंदर साध्वीला पाहिले गेले आणि सर्व कॅमेरांच्या नजरा तिच्याकडे खिळल्या. एवढेच नाही तर ती तरुणी देखील आपण साध्वी असल्याचे सांगत सुटली होती. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ व्हायरल होत होते. तितक्यात अनेकांना हा चेहरा ओळखीचा वाटला आणि तिचे बिंग फुटले.
3 / 7
हर्षा रिछारिया हिने दोन वर्षांपूर्वी अध्यात्माचा मार्ग निवडल्याचा दावा केला जात आहे. महामंडलेश्वर कैलाशानंदगिरी यांची ती शिष्या असून ती भोपाळची राहणारी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिने लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली होती.
4 / 7
निरंजनी अखाड्याच्या कैलाशानंदगिरी यांच्यासोबतचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर टाकले आहेत. ती स्वत:ला ३० वर्षांची असल्याचे सांगत आहे. ती अंकर आणि मॉडेलिंगही करते. लोक आता तिचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करत आहेत. तिच्या पोस्ट या अधिकतर धार्मिक आणि मेकअपच्या विषयांवर आहेत.
5 / 7
हर्षाचे शिक्षण बीबीए असून ती १६ व्या वर्षाची असल्यापासून काम करते. सुरुवातीला ती एका सुपरमार्केटमध्ये टुथपेस्टचे प्रमोशन करायची. यासाठी तिला दर दिवसाला १५० रुपये दिले जायचे. १८ व्या वर्षी तिला अँकरिंगचे काम मिळाले आणि त्यात तिला २५० रुपये मिळाले.
6 / 7
अँकरिंगच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. इथून तिला पुढे नाव कमविता आले आणि प्रसिद्धी मिळाली. आता महाकुंभाने तर तिला जगभरात पोहोचविले आहे. सर्वात सुंदर साध्वीवरून ट्रोल झाल्यानंतर हर्षाने यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
7 / 7
लोकांनी माझी वेषभूषा पाहताच जगातील सर्वात सुंदर म्हटले आहे ते ऐकून चांगले वाटत आहे. परंतू साध्वीचा टॅग मला दिला जातोय मी सांगू इच्छिते की तो सध्या तेवढा उचित नाहीय. कारण मी अजून त्यात खोलवर गेलेले नाहीय, असे हर्षाने सांगितले.
टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाSocial Viralसोशल व्हायरल