1 / 10हरियाणा युट्यूबर ज्योती मल्होत्रा प्रकरणानंतर एक प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. अखेर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय हेरगिरी करणाऱ्या गुप्तहेराला किती रुपये देते? सोशल मीडियावर ज्योती मल्होत्राची लग्झरी लाईफ चर्चेत आली आहे.2 / 10ज्योती मल्होत्राबाबत नवनवीन खुलासा समोर येत आहे. २०२० पर्यंत ज्योती एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होती. नोकरी गेल्यानंतर तिने युट्यूबवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्याच काळात ती पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात आली आणि तिथून तिने सीक्रेट माहिती लीक करण्यास सुरुवात केली.3 / 10हेरगिरीसाठी किती पैसे देते आयएसआय? - एका रिपोर्टनुसार, आयएसआय लोकेशनला सर्वात आधी प्राधान्य देते. म्हणजे गुप्त माहिती कुठून दिली जाते त्या हिशोबाने पैसे ठरतात. थायलँड, म्यानमारसारख्या देशात कमी पैसे दिले जातात. तर भारत, अमेरिकेसारख्या देशात हेरगिरी करण्यासाठी आयएसआय जास्त पैसे देते.4 / 10प्रमुख देशात हेरगिरी करणाऱ्यांना आयएसआय अधिकची रक्कम देते. गुप्तहेरांना पैसे देण्यासाठी आयएसआय दरवर्षी पाकिस्तान सरकारच्या बजेटमध्ये ५ अब्ज रूपये निधीची तरतूद करते. आयएसआय हा पैसा कर्मचाऱ्यांची सॅलरी आणि हेरगिरीसाठी लागणारा पैसा यासाठी खर्च करते. 5 / 10आयएसआयमध्ये सध्या ४ हजार गुप्तहेर आहेत जे विविध देशात कार्यरत आहेत. आयएसआय किती पैसे देते हे ना पाकिस्तान सरकारने सांगितले आहे, ना आयएसआयने स्पष्ट केले आहे. परंतु पकडलेल्या गुप्तहेराकडून याचे खुलासे झाले आहेत. आयएसआय या गुप्तहेरांना पैसे देते. 6 / 10पंजाब पोलिसांनी फेब्रुवारी २०२५ साली अमृतसरहून आयएसआय एजेंटला अटक केली होती. अटकेनंतर अमृतसरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानची आयएसआय लहान माहितीसाठी ५ हजार आणि मोठ्या माहितीसाठी १० हजार रुपये एजेंटला देते असं त्यांनी सांगितले.7 / 10२०११ साली अमेरिकेतील अधिकाऱ्याला पाकिस्तानची हेरगिरी करताना पकडले. या अधिकाऱ्याने खुलासा केला होता की, पाकिस्तानने त्याला हेरगिरी करण्यासाठी ३ कोटी रुपये दिले होते. याचा अर्थ पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा पद आणि इन्फॉर्मेशनच्या आधारे गुप्तहेरांना पैसे देते. 8 / 10नुकतेच भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा हिला हिसार पोलिसांनी अटक केली. तिच्यावर भारताची गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना पुरवल्याचा आरोप आहे. ज्योतीला किती पैसे मिळाले हे अद्याप तपासात समोर आले नाही.9 / 10 ज्योती मल्होत्रा ही हरियाणाची एक युट्यूबर आहे. ट्रॅव्हल विथ जो, असे तिच्या युट्यूब चॅनलचे नाव आहे. या चॅनेलवर तिचे ३७.७ लाख सबस्क्राइबर आहेत. याशिवाय, ती इंस्टाग्रामवरही खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे १३२ हजार फॉलोअर्स आहेत.10 / 10ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा प्राप्त करून २०२३ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. या दरम्यान, तिची भेट पाकिस्तानच्या उच्चायोगातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्याशी झाली. त्यानंतर त्यांच्यातील संबंध अधिकच घनिष्ट होत गेले.