शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:22 IST

1 / 8
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली हिसारमधील न्यू अग्रसेन कॉलनीतील रहिवासी असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​(३३) ही एका सामान्य घरातील मुलगी आहे. पण विलासी जीवन जगण्याच्या सवयीने तिला देशविरोधी कारवाया करण्याकडे ढकललं आहे. ज्योतीला पैसे कमवण्याची इतकी तीव्र इच्छा होती की, तिने १२वी उत्तीर्ण होताच नोकरी शोधायला सुरुवात केली. १४ वर्षांपूर्वी एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून तिने नोकरी सुरू केली होती.
2 / 8
रिसेप्शनिस्टची नोकरी सोडल्यानंतर तिने हिसारपासून २० किमी अंतरावर असलेल्या एका खाजगी शाळेत शिकवण्यास सुरुवात केली. काही काळ तिथे काम केले आणि नंतर हिसारमधील सरकारी महाविद्यालयाजवळील बाजारपेठेत एका खाजगी कार्यालयात रिसेप्शनिस्ट म्हणून पुन्हा काम करू लागली. कोरोना काळात, जेव्हा ती गुरुग्राममधील ती शेवटची नोकरी सोडून हिसारला पोहोचली, तेव्हा तिने सोशल मीडियावर व्हिडीओ बनवायला सुरुवात केली.
3 / 8
ज्योतीने यूट्यूब व्हिडीओ आणि ट्रॅव्हल ब्लॉगिंगमधून पैसे कमवायला सुरुवात केली, तेव्हा तिच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. पैशांची चटक लागल्यावर मोठ्या गाड्यांमध्ये प्रवास करण्याची, प्रतिष्ठित लोकांसोबत वेळ घालवण्याची, खाण्याची आणि पिण्याची आणि बँक खात्यात मोठी रक्कम दिसावी अशा इच्छा ज्योतीला देशविरोधी कारवायांकडे ढकलत होती.
4 / 8
ज्योतीने हिसारच्या एफसी महिला महाविद्यालयातून बीए केले होते. ती बहुतेकदा दिल्लीत राहायची. ज्योतीचे वडील वीज वितरण महामंडळातून निवृत्त आहेत. ज्योती ही त्यांची एकुलती एक मुलगी आहे. ज्योतीचे 'ट्रॅव्हल विथ जो' नावाच्या तिच्या चॅनलवर ३.७७ लाख फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर १.३१ लाख फॉलोअर्स आहेत.
5 / 8
ज्योती भारत आणि परदेशातील तिच्या प्रवासाशी संबंधित विशिष्ट ठिकाणांबद्दलच्या आठवणी आणि माहिती शेअर करते. ज्योतीला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता खूप व्ह्यूज मिळतात. ज्योतीचे असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यात तिने पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवली आहे. भारतात झालेल्या गेल्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांवर भारतीय आणि पाकिस्तानी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओही तिने अपलोड केले होते.
6 / 8
हिसार पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​आणि तिच्या पाच मैत्रिणींचा समावेश आहे. ज्योतीला हिसारमधील न्यू अग्रसेन एक्सटेंशन येथून अटक करण्यात आली. ज्योती 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवते.
7 / 8
ज्योती मल्होत्राने २२ ऑक्टोबर २०१८ रोजी तिचा पासपोर्ट बनवला. त्यानंतरही तिने काम सुरू ठेवले. सुमारे तीन वर्षांपूर्वी तिने ट्रॅव्हल विथ जो नावाचे एक यूट्यूब चॅनेल तयार केले आणि व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. यानंतर तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंग सुरू केले. या दरम्यान ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशच्या संपर्कात आली आणि हेरगिरीच्या जाळ्यात अडकली.
8 / 8
तिने दानिशचा मोबाईल नंबर घेतला. दोघेही एकमेकांशी बोलू लागले. त्यानंतर तिने दोनदा पाकिस्तानला भेट दिली. आयबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती दिल्लीहून एका शीख गटासह दोनदा पाकिस्तानला गेली आहे आणि एकदा एकटीच कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देण्यासाठी गेली होती. तिने दुबई, थायलंड, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशचाही प्रवास केला आहे.
टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तानIndiaभारत