शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Guru Purnima: मोदी, योगी, इंदिराजी, देशाच्या राजकारणातील दिग्गजांचे कोण होते गुरू? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 1:43 PM

1 / 6
आज देशभरामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. शिष्यांकडून त्यांच्या गुरूंना मानवंदना दिली जात आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण जाणून घेऊयात.
2 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामकृष्ण मठ आणि मिशनचे अध्यक्ष आत्मस्थानंद महाराजांना आपलं गुरू मानलं होतं. २०१७ मध्ये जेव्हा आत्मस्थानंद महाराजांचं निधन झालं तेव्हा मोदींनी भावूक शब्दांत श्रद्धांजली वाहिली होती.
3 / 6
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरक्षनाथ मंदिराचे पीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांच्या गुरूंचं नाव महंत अवैद्यनाथ होतं. योगींच्या आधी अवैद्यनाथ हेच पीठाधिश्वर होते. त्यांनीच योगी आदित्यनाथ यांना दिक्षा दिली होती. १२ सप्टेंबर २०१४ रोजी महंत अवैद्यनाथ यांचं निधन झालं होतं.
4 / 6
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा प्रभाव होता. दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडूनही त्यांनी राजकारण आणि लोकसेवेचे धडे घेतले होते.
5 / 6
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वडील मोतीलाल नेहरू यांच्याकडून राजकीय वारसा मिळाला होता. मात्र त्यांचे वास्तविक राजकीय गुरू हे महात्मा गांधी होते. गांधीजींनी नंतर जवाहरलाल नेहरू यांना आपला राजकीय उत्तराधिकारी घोषित केले होते.
6 / 6
योग गुरू धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी साठ आणि ७० च्या दशकात देशातील नामांकित व्यक्तींना योग शिकवला होता. ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेही योगगुरू होते. नंतर ते इंदिराजींचे सल्लागार बनले होते.
टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथIndira Gandhiइंदिरा गांधी