1 / 11जर तुमचा मोबाईल लॉकडाऊनमध्ये खराब झाला असेल, घरून काम करताना लॅपटॉप खराब झाला असेल आणि दुरुस्तीचा कोणताच मार्ग नसेल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. 2 / 11फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, पेटीएमसारख्या ई कॉमर्स कंपन्यांना सरकारने ४ मे पासून अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची डिलिव्हरी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यासोबत एक अट टाकण्यात आली आहे. 3 / 11केंद्र सरकारने दिलेली मंजुरी ही केवळ ऑरेंज आणि ग्रीन झोनसाठी असणार आहे. रेड झोनमध्ये या कंपन्या केवळ अत्यावश्यक वस्तूच पुरवू शकणार आहेत. 4 / 11जर तुम्ही ग्रीन किंवा ऑरेंज झोनमध्ये राहत असाल तर तुम्ही मोबाईल, लॅपटॉपसह अन्य साहित्य ऑनलाईन खरेदी करू शकणार आहात. सरकारने ४ मे पासून या वस्तूंची डिलिव्हीरी देण्यास मान्यता दिली आहे. 5 / 11जर तुम्ही रेड झोनमध्ये राहत असाल तर तुम्हाला याचा फायदा मिळणार नाही. रेड झोनमध्ये आता केवळ गरजेच्या वस्तूंचीच डिलिव्हरी करता येणार आहे. १७ मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढल्याने ही बंदी राहणार आहे. 6 / 11गृह मंत्रालयाने देशातील ७००हून अधिक जिल्हे रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी केली आहे. 7 / 11आरोग्य मंत्रालयाने आताही दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरु, अहमदाबाद या शहरांना रेड झोनमध्येच ठेवले आहे. या ठिकाणच्या ग्राहकांना आता १७ मे पर्यत वाट पहावी लागणार आहे. 8 / 11महत्वाचे म्हणजे या कंपन्यांची वेअर हाऊसेस ही या महत्वाच्या शहरांमध्येच आहेत. यामुळे डिलिव्हरीला काहीसा विलंब होऊ शकतो. 9 / 11तसेच डिलिव्हरी देताना डिलिव्हरी बॉय तुम्हाला हातावर सॅनिटायझर देवूनच तुम्ही मागविलेल्या वस्तूचे पॅकेट देणार आहे.10 / 11कोरोनाचे रेडझोन असलेल्या भागातून हे पार्सल येणार असले तरीही कंपन्या त्याची योग्य खबरदारी घेतील, असे आदेश केंद्राने दिले आहेत. 11 / 11मात्र, तुम्ही देखील कोरोना व्हायरसचे संक्रमन न होण्यासाठी हे पिशवीच्या आवरणातील बॉक्स नीट साफ करून, सॅनिटायझरचा वापर करून घ्यावेत.