Ranya Rao : आधी गोल्ड स्मगलिंग आता लँड गिफ्ट... रान्या रावच्या पॉलिटिकल कनेक्शनबद्दल धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:23 IST
1 / 11सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रान्या रावबद्दल नवीन धक्कादायक खुलासे झाले आहेत. या अभिनेत्रीचे कर्नाटकच्या राजकारणात चांगले संबंध होते असं तपासात दिसून आलं आहे.2 / 11कर्नाटक सरकारने रान्या रावची कंपनी KSIRODA इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला १२ एकर जमीन दिली होती.3 / 11KIADB (कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळ) ने २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कार्यकाळात कंपनीची डायरेक्टर हर्षवर्धनी राम्याच्या नावावर ही जमीन दिली होती. या खुलाशामुळे एका अभिनेत्रीच्या कंपनीने इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारी जमीन कशी मिळवली याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. 4 / 11तपासात असं दिसून आलें आहे की, रान्या तीन कंपन्यांची डायरेक्टर आहे, ज्यामुळे तिच्या व्यावसायिक व्यवहारांवर आणि राजकीय संबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. KSIRODA इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयरिस ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड, रान्या राव फोटोग्राफी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या आहेत.5 / 11कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाचे (KIADB) सीईओ महेश यांनी रविवारी सांगितलं की, सोन्या तस्करी प्रकरणातील आरोपी कन्नड अभिनेत्री रान्या रावशी संबंधित कंपनी Ksiroda इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला २ जानेवारी २०२३ रोजी १२ एकर जमीन देण्यात आली होती.6 / 11ही जमीन तुमकुरु जिल्ह्यातील सिरा औद्योगिक क्षेत्रात आहे. महेश यांच्या मते, त्याच दिवशी झालेल्या १३७ व्या राज्यस्तरीय सिंगल विंडो क्लिअरन्स कमिटी (SLSWCC) बैठकीत हे मंजूर करण्यात आलं.7 / 11प्रेस रिलीजनुसार, कंपनीने स्टील टीएमटी बार, रॉड आणि इतर संबंधित उत्पादनांच्या निर्मितीसाठी एक युनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कंपनीने या प्रकल्पात १३८ कोटी रुपये गुंतवण्याची योजना आखली होती आणि त्यामुळे सुमारे १६० लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा होती.8 / 11कंपनी सुरू केल्यानंतर काही महिन्यांतच सरकारी जमीन मिळाली यावरून रान्या रावच्या राजकीय संबंधांची ताकद किती आहे याचा अंदाज येतो. २१ एप्रिल २०२२ रोजी कंपनी नोंदणीकृत केली आणि २ जानेवारी २०२३ रोजी १२ एकर जमीन मिळाली. 9 / 11मोठ्या कंपन्यांना KIADB कडून जमीन मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात, परंतु रान्या रावने ही प्रक्रिया अवघ्या काही महिन्यांत पूर्ण केली. डीआरआय (रेव्हेन्यू इंटेलिजेंस डायरेक्टरेट) च्या चौकशीत, त्याच्या कंपनीचे शेअर्स, महसूल आणि बँक खात्यांची चौकशी केली जात आहे.10 / 11डीआरआय अधिकाऱ्यांनी रान्याचा मोबाईल आणि लॅपटॉपमधून संपूर्ण डेटा जप्त केला आहे, ज्यामध्ये अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फोनमध्ये अनेक मोठ्या नेत्यांचे आणि पोलीस अधिकाऱ्यांचे नंबर सापडले आहेत. या यादीत सध्याच्या आणि माजी सरकारमधील विद्यमान आणि माजी मंत्र्यांचा समावेश आहे.11 / 11ती फक्त काही विशिष्ट लोकांशीच सतत संपर्कात होती. तिच्या लॅपटॉपवर रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित डेटा देखील सापडला, ज्यामुळे अधिक प्रश्न उपस्थित झाले. डीआरआयचे अधिकारी रान्याच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सचं विश्लेषण करत आहेत.