भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 10:46 IST
1 / 10लडाखमधील गलवान घाटी आणि नदी भारतासाठी खूप महत्वाची आहे. याच ठिकाणी 1962, 1975 आणि सोमवारी चीनसोबत संघर्ष झाला होता. 14 हजार फूट उंचीवर आणि उणे 20 डिग्री पर्यंत जाणाऱ्या तापमानामध्ये जवानांचा संयम सूटू लागला आहे. ही जागा अक्साई चीनच्या भागामध्ये येते, ज्या अक्साई चीनवर चीन गेल्या 7 दशकांपासून नजर ठेवून आहे. 2 / 10भारत आणि चीनमध्ये याच घाटीवरून एक मोठे युद्ध आणि आणि दोन छोटे संघर्ष झालेले आहेत. आजही दोन्ही देशांदरम्य़ान तणावाचे वातावरण आहे. 3 / 10गलवान घाटीचा इतिहास 121 वर्षे जुना आहे. या घाटीचे नावही भारतीय नागरिकावरून पडलेले आहे. लडाखमधील गुराखी गुलाम रसूल गलवान याने ही घाटी शोधली होती. गुलमाने त्याच्या पुस्तकातील 'द फाइट ऑफ चाइनीज' या अध्यायामध्ये याबाबत सांगितले आहे. 4 / 10विसाव्या शतकातील ब्रिटिशांचा भारत आणि चीनी साम्राज्यामधील सीमारेषेवर हे पुस्तक आहे. चला जाणून घेऊयात या गलवान घाटीच्या जन्माची कहानी. 5 / 10गुलामचा जन्म 1878 मध्ये झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने घर सोडले होते. त्याच्या डोक्यात केवळ नवीन जागा शोधण्याचे विचार घोळत असायचे. याच त्याच्या छंदाने त्याला इंग्रजांचा आवडता गाईड बनविले. खरे पाहता लडाखचा भाग इंग्रजांना आवडत नव्हता6 / 101899 मध्ये गुलामने लेहहून ट्रेकिंग सुरु केली. आणि लडाखच्या आसपासच्या अनेक नवीन भागांमध्ये पोहोचला. यामध्ये एक होती गालवन घाटी आणि नदी. ही एक ऐतिहासिक घटनाच मानावी लागेल कारण या नदीचे आणि घाटीचे नाव एका गुराख्यावरून ठेवण्यात आले. 7 / 10गुलामने गलवान नावामागे त्याच्या आईने ऐकवलेली कहानी सांगितली आहे. तेव्हा काश्मीरच्या खोऱ्यामध्ये हिंदू महाराजांचे राज्य होते. त्याच्या वडिलांचे नाव कर्रा गलवान होते. कर्रा म्हणजे काळा आणि गलवान म्हणजे डाकू, दरोडेखोर. कर्रा त्याच्या टोळक्याचा म्होरक्या होता. तो फक्त श्रीमंतांना लुटत होता आणि मिळालेला पैसा गरीबांमध्ये वाटत होता. 8 / 10काही काळानंतर गुलामच्या वडिलांना म्हणजेच कर्राला डोगरा राजाच्या शिपायांनी पकडले आणि मृत्यूदंड दिला. यानंतर गलवान टोळीचे लोक लेह आणि बाल्टिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. तर काही गलवान हे चीनच्या शिंजियांग प्रांताच्या यारकन्दमध्ये स्थायिक झाले. 9 / 10फॉरसिकिंग पॅराडाईज पुस्तकानुसार गुलाम रसूल 15 महिन्यांमध्ये आशिया आणि तिबेटची कठीण यात्रा केली होती. 10 / 10लेहच्या चंस्पा योरतुंग रोडवर गुलाम रसूलच्या पूर्वजांचे घर आहे. त्यांच्या नावे गलवान गेस्ट हाऊसही आहे. आता त्यांची चौथी पीढी तिथे राहत आहे. त्यांचे वारसदार येणाऱ्या पाहुण्यांना रसूलचे किस्से सांगतात.