शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताने उचलेली पाच निर्णायक पावलं, ज्यामुळे २६/११ चा आरोपी तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण झालं शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:14 IST

1 / 9
२००८ साली २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा पुढच्या काही तासांत भारतामध्ये दाखल होणार आहे. अमेरिकेतील प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा एनआयए आणि आणि गुप्तचर संस्था रॉचं संयुक्त पथक तहव्वूर राणाला घेऊन विशेष विमानाने भारतात रवाना झालं आहे.
2 / 9
भारतात येण्यापूर्वी तहव्वूर राणा याने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला होता. मात्र आपल्या प्रत्यार्पणास स्थगिती देण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र त्याचं प्रत्यार्पण रोखण्याचा अर्ज अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला होता.
3 / 9
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणामध्ये भारत सरकारने मुत्सद्देगिरी दाखवत उचलेली पाच पावलं निर्णायक ठरली होती. ती खालील प्रमाणे आहेत.
4 / 9
सन २०११ मध्ये भारताची तपास यंत्रणा एनआयएने तहव्वूर राणाविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.
5 / 9
त्यानंतर भारताने ४ डिसेंबर २०१९ रोजी पहिल्यांदा डिप्लोमॅटिक चॅनेल्सच्या माध्यमातून तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.
6 / 9
१० जून २०२० रोजी भारताकडून तहव्वूर राणा याच्या तात्पुरत्या अटकेची मागणी करण्यात आली होती.
7 / 9
फेब्रुवारी २०२१ मध्ये भारताने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी अधिकृतरीत्या केली. तसेच अमेरिकन न्याय विभागाला एक पत्र पाठवले.
8 / 9
२२ जून २०२१ रोजी अमेरिकेच्या केंद्रीय न्यायालयाने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी झालेल्या सुनावणीवेळी भारताने सबळ पुरावे दिले होते.
9 / 9
या सर्व प्रयत्नांमुळे अमेरिकेतील न्यायालयीन लढाईमध्ये आपली बाजू भक्कम करत भारताने तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण घडवून आणण्यात यश मिळवलं.
टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाIndiaभारतUnited Statesअमेरिकाterroristदहशतवादी