शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रेल्वेची वैशिष्टेये

By admin | Updated: February 25, 2016 00:00 IST

1 / 6
गुवहाटी-त्रिवेंद्रम एक्सप्रेस ही बेभरवशाची लांब पल्ल्याटी ट्रेन आहे. या ट्रेनचा नियोजित प्रवासाचा वेळ ६५ तास पाच मिनिटांचा आहे. पण या ट्रेनला प्रत्येक ट्रीपमागे सरासरी १० ते १२ तासांचा विलंब होतो.
2 / 6
त्रिवेंद्रम-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस ५२८ कि.मी.चा प्रवास करते. गुजरातमधील वडोदरा ते राजस्थानातील कोटा दरम्यान ही ट्रेन एकही थांबा घेत नाही. हावडा-अमृतसर एक्सप्रेस सर्वाधिक ११५ स्थानकांवर थांबते.
3 / 6
दिब्रुगड ते कन्याकुमारी मार्गावर धावणारी विवेक एक्सप्रेस ४२७३ कि.मी.चा प्रवास करते. वेळ आणि अंतराच्या बाबतीत भारतातील सर्वाधिक प्रवास करणारी ही ट्रेन आहे.
4 / 6
जम्मू-काश्मीरमधील पीर पांजाल हा भारतातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा आहे. ११.२१५ किमी लांबीचा हा बोगदा आहे. डिसेंबर २०१२ मध्ये या बोगद्याचे काम पूर्ण झालं.
5 / 6
निलगिरी एक्सप्रेस या ट्रेनचा ताशी वेग १० कि.मी. आहे. भारतातील ही सर्वात धीम्यागतीने धावणारी ट्रेन आहे.
6 / 6
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी रेल्वे जाळे असलेली रेल्वे आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. या आपल्या भारतीय रेल्वेची काही वैशिष्टये. नवी दिल्ली-भोपाळ मार्गावर धावणारी शताब्दी एक्सप्रेस ही भारतातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. या ट्रेनचा सरासरी वेग ताशी ९१ कि.मी. आहे. १९५ कि.मी.च्या मार्गावर ही ट्रेन ताशी सर्वोच्च १५० कि.मी. वेगाचा टप्पाही गाठते.