1 / 8मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दुपारी साडेचार ते 5 च्या सुमारास त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 2 / 8या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियातून समोर आले आहे. त्यामध्ये, मोदींसोबत चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हसताना दिसत आहेत. तर, मोदींच्या चेहऱ्यावरही हसू उमटल्याचे दिसून येते.3 / 8या भेटीत मुख्यमंत्री शिंदेंनी विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोदी भेटीपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली. 4 / 8त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे असल्याचं म्हटलं होतं. आता, मोदी भेटीचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. 5 / 8भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुंबईपुत्र विनाद तावडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली. 6 / 8या भेटीत त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या नवीन सरकारला शुभेच्छा दिल्या. विनोद तावडेंनी मुख्यमंत्री शिंदेंना मोदी@20 हे पुस्तक भेट दिले. तर देवेंद्र फडणवीस यांना जादू की झप्पी दिल्याचे फोटोत दिसत आहे. 7 / 8दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेतच्या बैठकीत नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यत्वे चर्चा झाल्याचे समजते. दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी मुख्यत्वे चर्चा झाली. 8 / 8आषाढी एकादशीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीही आषाढी एकादशीनंतर तुम्हाला माहिती मिळेल, असे पत्रकारांशी बोलताना म्हटले.