1 / 11 कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन केंद्र सरकारनं दोन आठवड्यांनी वाढवला आहे. त्यामुळे १७ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहील. या कालावधीत ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही सवलती देण्यात येतील. याबद्दलची नियमावली गृह मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. 2 / 11कोरोना विषाणूबद्दलची माहिती देणाऱ्या आरोग्य सेतू अॅपबद्दल महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हे अॅप डाऊनलोड करणं बंधनकारक असेल. 3 / 11 सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसोबतच कंटेनमेंट झोनमध्ये वास्तव्यास असलेल्या सगळ्या रहिवाशांनादेखील आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावं लागेल. याकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष द्यावं, असे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत4 / 11याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे अॅप डाऊनलोड करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. झोमॅटोनंदेखील खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅप इन्स्टॉल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 5 / 11आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं जातं. आपण कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलो आहोत का, याची माहिती ब्लूटूथच्या माध्यमातून अॅप वापरणाऱ्या व्यक्तीला मिळते.6 / 11कोरोनाबाधित व्यक्ती किती दूर आहे, याची माहिती यावर मिळते. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती फार दूर असेल तर ग्रीन अलर्ट मिळतो. ती व्यक्ती मध्यम अंतरावर असल्यास ऑरेंज आणि अतिशय जवळ असल्यास रेड अलर्ट मिळतो.7 / 11करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेले आरोग्य सेतू हे अॅप स्मार्टफोनवर डाउनलोड केले नाही, तर एक हजार रुपयांचा दंड केला जाईल, असा इशारा नोएडा येथील पोलिसांनी मंगळवारी दिला.8 / 11नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथे राहणाऱ्यांनी; तसेच येथे बाहेरून येणाऱ्यांनी आरोग्य सेतू हे अॅप डाउनलोड केले नाही, तर त्यांना एक हजार रुपयांचा दंड अथवा सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.9 / 11 हे अॅप डाउनलोड न केल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना डाउनलोड करण्यास सांगितले जाईल, त्यांनी ते त्वरित डाउनलोड केले तर त्यांना माफ केले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.10 / 11 हे अॅप डाउनलोड न केल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना डाउनलोड करण्यास सांगितले जाईल, त्यांनी ते त्वरित डाउनलोड केले तर त्यांना माफ केले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.11 / 11दिल्लीतील ग्रेटर नोएडा परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमित रुग्ण आढळले आहेत, त्या पार्श्वभूमीवर खरबदारी उपाय म्हणून नोएडा पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.