शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:30 IST

1 / 9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दिवसेंदिवस कर वाढवत आहेत.त्यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आम्ही टॅरिफ वाढवत आहोत असं सांगितलं आहे.
2 / 9
त्यांनी अमेरिका-भारत व्यापार कराराच्या आधीही भारतावर २५ टक्के टॅरिफ लादला होता आणि भारताने याला प्रतिसाद दिल्यावर त्यांनी टॅरिफ दर ५० टक्क्यांपर्यंत वाढवला. इतकेच नाही तर त्यांनी येत्या १२ ते १८ महिन्यांत भारतीय औषध कंपन्यांवरील टॅरिफ दर २५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची धमकी दिली आहे.
3 / 9
भारतातील अनेक औषध कंपन्यांचा अमेरिकेत मोठा व्यवसाय आहे. दरवर्षी देशातून आवश्यक औषधे अमेरिकेत निर्यात केली जातात.
4 / 9
२०२० मध्ये, कोरोना साथीच्या काळात, ज्यावेळी अमेरिका 'हायड्रॉक्सीक्लोरोक्विन टॅब्लेट' या आवश्यक औषधाच्या संकटाचा सामना करत होती, तेव्हा भारताने एकाच कॉलवर ५० लाख गोळ्या निर्यात केल्या, यावरुन अमेरिकेला भारतातून औषधांची किती गरज आहे याचा अंदाज येतो.
5 / 9
एप्रिल २०२० मध्ये भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन टॅब्लेटच्या ५० लाख गोळ्या अमेरिकेला पाठवल्या होत्या. हे मलेरियाविरोधी औषध कोरोनाच्या उपचारांसाठी वापरले जात होते.
6 / 9
त्यावेळी भारताने या मलेरियाविरोधी औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीवरून आणि काही इतर देशांना कोरोना विषाणूच्या साथीला तोंड देण्यासाठी मदत करण्यासाठी, मानवतेच्या आधारावर मलेरियाविरोधी औषध 'हायड्रॉक्सीक्लोरोक्विन'च्या निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली.
7 / 9
कोरोना काळात भारताने विदेशात केलेली या औषधाची निर्यात ही सर्वात मोठी औषध निर्यात होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवी दिल्लीला फुफ्फुसांच्या आजारावर संभाव्य उपचार म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा सुरू ठेवण्याची विनंती केली होती.
8 / 9
डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मलेरियाविरोधी औषधाच्या अमेरिकेच्या आदेशावरील बंदी उठवण्याची विनंती केली होती, याचा भारत एक प्रमुख उत्पादक आहे. जगातील ७० टक्के हायड्रॉक्सीक्लोरोक्विन उत्पादन करणाऱ्या भारताने ७ एप्रिल रोजी बंदी उठवली.
9 / 9
त्यावेळी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीवरून, भारताने अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्विन टॅब्लेट तसेच औषधाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या 9 मेट्रिक टन सक्रिय औषध घटक किंवा API निर्यात करण्यास मान्यता दिली होती.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या