मुकेश अंबानींसाठी धीरुभाईंनी असा शिक्षक नेमला होता, जो शिकवत नसे...; जाहिरात पाहून भलेभले चाट झालेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:20 IST
1 / 11रिलायन्स ग्रुपचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी 60 च्या दशकात वर्तमानपत्रात जाहिरात देऊन मुकेश अंबानींसाठी खास शिक्षक शोधला होता. 2 / 11शालेय शिक्षण देणार नाही असा शिक्षक त्यांना हवा होता. 3 / 11धीरूभाई अंबानींनी मुलगा मुकेश अंबानीसाठी शिक्षक नियुक्त केला जो शिकवण्याशिवाय सर्व काही करू शकत होता.4 / 11या शिक्षकाचा तसा शोधही घेण्यात आला. तर वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्यांनी या शिक्षकाची निवड केली होती. 5 / 11धीरुभाईंनी जाहिरातीत लिहिले होते की, आम्हाला अशा शिक्षकाची गरज आहे जो शालेय पुस्तके शिकवणारा नसावा.6 / 11धक्का बसला नाही ना, खरं तर धीरूभाईंना सामान्य ज्ञान, व्यवहार ज्ञान देणारा व्यक्ती हवा होता, जो मुकेश अंबानींना उद्योगांच्या दृष्टीने तयार करेल. 7 / 11खुद्द मुकेश अंबानी यांनी याबाबत सांगितले आहे. महेंद्रभाईंची बरीच शोधाशोध करून निवड करण्यात आली होती. 8 / 11पुस्तकी दुनियेत वेळ घालवण्याऐवजी मुकेश अंबानींच्या व्यावहारिक ज्ञानाकडे अधिक लक्ष दिले गेले.9 / 11दहावीपर्यंत शिकलेले धीरूभाई इतरांसारखे नव्हते, तर वेगळी विचारसरणी असलेली व्यक्ती होते, असे म्हणतात.10 / 11धीरूभाईंच्या या विचारसरणीने त्यांना जमिनीवरून आकाशात नेण्याचे काम केले. आज जग त्यांचे उदाहरण देतेय.11 / 11वडिलांनी दिलेल्या धड्यांमुळे मुकेश अंबानी आज अव्वल श्रीमंतांमध्ये गणले जातात आणि व्यवसायाला नवीन उंचीवर नेत आहेत.