शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

या गावचे लोक रोज तिकीट काढतात, पण प्रवास करत नाहीत; स्टेशनवर रेल्वेही येते, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:51 IST

1 / 8
भारतीय रेल्वे केवळ रेल्वे प्रवास किंवा माल वाहतूकच नाही तर अनेक प्रकारच्या सेवा पुरविते. तुम्हाला आठवतेय भारतीय रेल्वेचा एक वेगळा अर्थसंकल्प संसदेत मांडला जायचा. रेल्वे जवळपास ३६ प्रकारच्या सेवा पुरविते. एवढ्या मोठ्या रेल्वे खात्याबाबत एक गोष्ट अशी आहे जी अनेकांना माहिती नाही. असे एक रेल्वे स्टेशन आहे, ज्यावर जाऊन रोज तेथील लोक रेल्वेची तिकीटे काढतात, रेल्वेही येते पण त्यातून प्रवास कोणी करत नाही.
2 / 8
रेल्वेचा प्रवास करायचा झाला तर रेल्वेचे तिकीट काढावे लागते. ऑनलाईन किंवा ऑफलाईन तिकीट खिडकीवर जाऊन हे तिकीट मिळते. विनातिकीट पकडले तर दंड बसतो शिवाय तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. रेल्वेचा तसा नियम आहे. परंतू, या स्टेशनवर लोक प्रवास तर करत नाहीत परंतू रेल्वेचे तिकीट मात्र जरूर काढतात.
3 / 8
हे रेल्वे स्टेशन उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मधील दयालपूरला आहे. दयालपूर रेल्वे स्टेशनवर हा प्रकार केला जातो. याचे कारणही तसेच गमतीशीर आहे.
4 / 8
तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या सांगण्यावरून रेल्वे खात्याने दयालपूरला रेल्वे स्टेशन बांधले होते. तिथे हळूहळू रेल्वे देखील थांबायला लागल्या होत्या. आजुबाजुच्या गावांतील लोक ये-जा देखील करू लागले होते. परंतू, हळू हळू ही संख्या घटू लागली. एवढी घटली की रेल्वेने ते स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला.
5 / 8
रेल्वेच्या नियमानुसार दिवसाला तर ५० रेल्वे तिकीटांचा खप झाला नाही तर ते रेल्वे स्टेशन बंद केले जाते. म्हणजेच टाळे ठोकले जाते. तसेच दयालपूरचे झाले. ५० वर्षांनी हे रेल्वे स्टेशन रेल्वेने बंद केले.
6 / 8
स्टेशन बंद झाल्यावर मग दयालपूरच्या लोकांचे डोळे उघडले. त्यांना रेल्वेची तर गरज होती, परंतू काळ बदलला तसे जास्त कोणी वापरत नव्हते. यामुळे तिकीटांचा खपही होत नव्हता. २००६ मध्ये हे स्टेशन बंद झालेले. लोकांनी अनेक आंदोलने करून मागण्या करून ते २०२० ला पुन्हा रेल्वेला सुरु करायला लावले.
7 / 8
तरीही कोणी फारसे रेल्वेने प्रवास करत नव्हते. यामुळे दयालपूरच्या लोकांनी एक शक्कल लढविली. रेल्वेला जेवढी तिकिटे लागतात ती लोकवर्गणी काढून दररोज काढायचा निर्णय घेतला. असे केले नाही तर रेल्वे पुन्हा हे स्टेशन नुकसान होतेय म्हणून बंद करेल अशी भीती त्यांना होती.
8 / 8
दयालपूरचे लोक दररोज ७०० रुपयांची तिकीटे या स्टेशनवरून काढतात. परंतू, या तिकिटांवर प्रवास मात्र कोणीच करत नाही. या स्टेशनवर एक रेल्वे येते. ज्या लोकांना कामानिमित्त कुठे जायचे असते ते त्यांची वेगळी तिकीटे काढतात आणि जातात. परंतू, ७०० रुपयांची जी तिकिटे काढली जातात त्या तिकिटांवर मात्र कोणीच जात नाही.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेश